वाघग्रस्त भागात दिवसा वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 09:52 PM2018-11-01T21:52:37+5:302018-11-01T21:53:12+5:30

वाघाच्या दहशतीने हादरलेल्या भागात शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा, असा आदेश ऊर्जा विभागाने बुधवारी जारी केला आहे. याबाबतचा प्रस्ताव वीज वितरण कंपनीने ऊर्जा विभागाकडे पाठविला होता.

Electricity in daytime in turbulent areas | वाघग्रस्त भागात दिवसा वीज

वाघग्रस्त भागात दिवसा वीज

Next
ठळक मुद्देऊर्जा विभागाचा आदेश : कळंब, राळेगाव, पांढरकवडा तालुक्यांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वाघाच्या दहशतीने हादरलेल्या भागात शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा, असा आदेश ऊर्जा विभागाने बुधवारी जारी केला आहे. याबाबतचा प्रस्ताव वीज वितरण कंपनीने ऊर्जा विभागाकडे पाठविला होता.
जिल्ह्यातील राळेगाव, कळंब, पांढरकवडा आदी तालुक्यांमध्ये वाघिणीने धुमाकूळ घातला आहे. त्यातच जिल्ह्यात कृषी फिडरवर १६ तास भारनियमन सुरू आहे. तीन दिवस दिवसा तर तीन दिवस रात्री वीज पुरवठा करण्यात येत आहे. वाघग्रस्त भागात १५ तासाचे भारनियमन करण्यात येत होते. त्या ठिकाणी रात्री वीज पुरवठा करण्यात येत होता. तेथील नागरिकांनी वीज कार्यालयावर धडक दिली होती. ऊर्जामंत्र्यांनी यावर उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. यानुसार वीज वितरण कंपनीने वाघग्रस्त भागात रात्रीचा वीज पुरवठा थांबवून दिवसा वीज देण्याचा प्रस्ताव ऊर्जा विभागाकडे सादर केला. त्यानुसार ऊर्जा विभागाने वाघग्रस्त परिसरात दिवसा थ्रीफेज वीज पुरवठा करण्याचे आदेश दिले आहे. सदरचा वीज पुरवठा ३० नोव्हेंबरपर्यंत करण्याचे आदेश आहे.
इतर कृषी फिडरवर लाईट ट्रिप होत आहे. यावर उपाययोजना करण्याच्या सूचना अभियंत्यांना दिल्या आहेत. यामुळे सलग आठ तास वीज देण्यासंदर्भात प्रयत्न केले जात आहे. कंपनीने १४५ अतिरिक्त रोहित्राची मागणी कंपनीने केली आहे.

वाघग्रस्त भागात दिवसा वीज पुरवठ्याचा प्रस्ताव ऊर्जा विभागाकडे सादर करण्यात आला होता. यासोबतच भारनियमनाचा प्रश्न सोडविण्यासाठी विविध उपाययोजनावर भर देण्यात आला आहे. थकित घरगुती ग्राहकांवर थेट कारवाई केली जात आहे.
- सुरेश मडावी, अधीक्षक अभियंता, वीज वितरण कंपनी, यवतमाळ

Web Title: Electricity in daytime in turbulent areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.