पोलीस वसाहतीतच वीज चोरी

By admin | Published: April 26, 2017 12:08 AM2017-04-26T00:08:54+5:302017-04-26T00:08:54+5:30

येथील पळसवाडी कॅम्पमध्ये पोलीस वसाहती आहे. या इमारतींमध्ये सर्रास वीज चोरी केली जात असल्याने खुद्द अपर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी

Electricity theft in police colonies | पोलीस वसाहतीतच वीज चोरी

पोलीस वसाहतीतच वीज चोरी

Next

अपर अधीक्षकांनी बजावली नोटीस : क्वॉर्टर ३०० अन् मीटर शंभरच !
सुरेंद्र राऊत यवतमाळ
येथील पळसवाडी कॅम्पमध्ये पोलीस वसाहती आहे. या इमारतींमध्ये सर्रास वीज चोरी केली जात असल्याने खुद्द अपर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली आहे.
नोटीसमध्ये वीज चोरीऐवजी वीज पुरवठा नियमित करून घ्यावा, असा शब्दच्छल करण्यात आला. पोलीस वसाहतीत हा प्रकार चालत असल्याने वीज कंपनीचे स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा आहे. पळसवाडी कॅम्प परिसरात बिल्डींग क्रमांक एकमध्ये ३६ क्वॉर्टर असून केवळ पाच वीज मीटर आहेत. बिल्डींग क्रमांक दोन आणि तिनचीसुद्धा अशीच स्थिती आहे. यात जवळपास ३०० अन् मीटर मात्र शंभरच आहे. जुन्या क्वॉर्टरमध्ये थेट वीज जोडण्या घेण्यात आल्या आहेत. पोलीस वसाहतीत चक्क वीज चोरीचा प्रकार सुरू असल्याची बाब वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर अपर जिल्हा पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना वीज देयकाचा वेळेत भरणा करणे आणि वीज पुरवठा नियमित करून घेण्याची सूचना केली.
याबाबत गुरूवारी नोटीस बजावण्यात आली. मात्र त्याउपरही कर्मचाऱ्यांकडून अधिकृत वीज जोडणीबाबत प्रतिसाद मिळाला नाही. शिस्तीच्या खात्यातील कर्मचाऱ्यांकडून नियमाचे उल्लघन केले जात असल्याचे दिसून येत आहे. वीज वितरणची यंत्रणा हा प्रकार राजरोसपणे बघत आहे. एरव्ही बिल भरण्यास काही दिवसांचा विलंब झाल्यास थेट पुरवठा तोडण्याची कारवाई करणारे महावितरण प्रशासन येथे मात्र मूग गिळून गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात देयक न भरल्यास त्वरित वीज पुरवठा खंडित करतात. गरिबांना अंधारात राहावे लागते. येथे मात्र पोलीस चोरीच्या उजेडात राहतात.
मीटर रूम नव्हे, मौत का कुआ
पोलीस वसाहतीत वीज पुरवठा करणारे सर्व मीटर एकाच खोलीत बसविण्यात आले आहे. येथील स्थिती अतिशय बिकट आहे. जीवंत विद्युत तारा उघड्या असून त्यावरूनच थेट जोडणी आहे. मीटर रूमचा दरवाजाही उघडणे धोकादायक आहे. जुन्या बिल्डींगच्या मीटर रुमला दार नसल्याने तेथे डुकरांनी आश्रय घेतला आहे. येथे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Electricity theft in police colonies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.