सैराट झालेल्या हत्तीमुळे नागपूर-हैदराबाद महामार्गावर पळापळ; महिला ठार, एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 11:37 AM2018-10-03T11:37:34+5:302018-10-03T14:52:17+5:30
नागपूर-हैदराबाद महामार्गावर वडनेरा-पोहना-पिंपरी या परिसरात बुधवारी सकाळी सैराट झालेल्या एका हत्तीने धुमाकूळ घातला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: नागपूर-हैदराबाद महामार्गावर वडनेरा-पोहना-पिंपरी या परिसरात बुधवारी सकाळी सैराट झालेल्या एका हत्तीने धुमाकूळ घातला. हत्तीच्या या धुमाकुळीत हिंगणघाट येथील रहिवासी असलेली एक व्यक्ती जखमी झाली तर एक महिला ठार झाली आहे.
वनविभागाने वाघ व वाघिणींचा शोध घेण्यासाठी पाच हत्ती मागवले होते. हे हत्ती जंगलात वाघ व वाघिणीचा शोध घेत फिरत असत. यापैकीच एक हत्ती पिसाळला व तो गावालगत आला असावा असा अंदाज आहे. हत्ती पिसाळल्याची बातमी पसरताच नागरिकांनी येथे गर्दी केली. हत्तीने केलेल्या हल्ल्या राळेगण येथील अर्चना मोरेश्वर कुलसुंगे ही महिला ठार झाली. या घटनेची माहिती वनविभागाला कळवण्यात आली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी माहूताला पाचारण करून एका व्हॅनमध्ये हत्तीला जेरबंद केले व रवाना केले.