एसटीचा उफराटा कारभार बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 09:43 PM2019-05-27T21:43:44+5:302019-05-27T21:44:12+5:30

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची प्रतिमा मलीन होण्याचे नवनवीन प्रकार पुढे येत आहे. विविध कारणांमुळे प्रवाशांची होणारी गैरसोय ही बाब नित्याची झाली आहे. आता तर चालक-वाहकांनाही मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विभागीय कार्यालयातील वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याने ही परिस्थिती ओढवली आहे.

Elevate the excise duty of ST | एसटीचा उफराटा कारभार बेदखल

एसटीचा उफराटा कारभार बेदखल

Next
ठळक मुद्देइटीआयचे की पॅड उलटे : १५३ मशीनसाठी ३० चार्जर

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची प्रतिमा मलीन होण्याचे नवनवीन प्रकार पुढे येत आहे. विविध कारणांमुळे प्रवाशांची होणारी गैरसोय ही बाब नित्याची झाली आहे. आता तर चालक-वाहकांनाही मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विभागीय कार्यालयातील वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याने ही परिस्थिती ओढवली आहे.
महामंडळाच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा दुवा असलेला वाहक विविध तांत्रिक अडचणींमुळे भरडला जात आहे. पुसद आगारात सुरू असलेला उफराटा कारभार यामध्ये भर घालत आहे. या आगारामध्ये १५३ इटीआय मशीन आहेत. त्या वेळोवेळी चार्ज कराव्या लागतात. मात्र या १५३ मशीनसाठी केवळ ३० चार्जर उपलब्ध आहे. यामध्ये वाहकांची चार्जर मिळविण्यासाठी ओढाताण होत आहे. अलीकडेच नादुरुस्त झालेली इटीआय मशीन दुरुस्तीसाठी यवतमाळला पाठविली. ट्रायमॅक्स कंपनीने दुरुस्त केली. मात्र त्यावर कीपॅड चक्क उलटे लावले. वाहकाला आडवे-उभे करून ही मशीन हाताळावी लागत आहे.
महामंडळातून तिकीट ट्रे जवळपास थांबला आहे. अत्यावश्यक वेळी वापरण्यासाठी वाहकांकडे दिला जातो. आज नवीन वाहकांना रूटचार्ट माहीत नाही. अशावेळी त्यांच्यापुढे तिकीट कशी द्यायची हा प्रश्न निर्माण होतो. आवश्यकतेपेक्षा कमी मशीन उपलब्ध असल्याने बसफेऱ्या उशिरा सुटणे, रद्द होणे असे प्रकार घडत आहे. यामध्ये महामंडळाचे आर्थिक नुकसान होत आहे. वरिष्ठांकडून मात्र हा विषय गांभीर्याने घेतला जात नाही.
बसफेऱ्या रद्दचा आजार
यवतमाळ बसस्थानकावरून सुटणाºया अनेक बसफेºया रद्द होत आहे. नादुरुस्त बसेसच्या वाढत्या संख्येमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने ब्रेक डाऊन वाढले आहे. मात्र दुरुस्तीसाठी विलंब लावला जात आहे. शिवाय यवतमाळ आगारात बसेसचा तुटवडाही आहे. यामुळे प्रामुख्याने ग्रामीण भागातील बसफेºया रद्द करून प्रवाशांना वेठीस धरले जात आहे.

Web Title: Elevate the excise duty of ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.