ऊस उत्पादक व कामगारांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 06:00 AM2020-01-29T06:00:00+5:302020-01-29T06:00:19+5:30
बंद पडलेल्या साखर कारखान्यावर १२५ कोटी रुपयांचे कर्ज आहे. कारखाना बंद पडल्यामुळे शेतकरी व कामगार देशोधडीला लागले आहे. बेरोजगारीची कुºहाड कोसळल्याने कामगारांचे संसार उघड्यावर आले आहे. शेतकऱ्यांना ऊस इतर कारखान्याला द्यावा लागत आहे. ऊस उत्पादकांचे उसाची देयके कारखान्याकडे आहे. हंगामी कामगार व पूर्णवेळ कामगारांचा पगार अडकला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : तालुक्यातील पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखाना मागील चार वर्षांपासून बंद पडला आहे. याचे परिणाम शेतकरी व स्थानिक कामगारांना भोगावे लागत आहे. हा कारखाना सुरू करण्यात यावा, या मागणीसाठी येथील कामगार व परिसरातील शेतकऱ्यांनी संयुक्त लढा उभारला आहे. कारखाना परिसरातच हे आंदोलन सुरू आहे.
बंद पडलेल्या साखर कारखान्यावर १२५ कोटी रुपयांचे कर्ज आहे. कारखाना बंद पडल्यामुळे शेतकरी व कामगार देशोधडीला लागले आहे. बेरोजगारीची कुºहाड कोसळल्याने कामगारांचे संसार उघड्यावर आले आहे. शेतकऱ्यांना ऊस इतर कारखान्याला द्यावा लागत आहे. ऊस उत्पादकांचे उसाची देयके कारखान्याकडे आहे. हंगामी कामगार व पूर्णवेळ कामगारांचा पगार अडकला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने कारखान्यावर सांकेतिक ताबा घेतला आहे. अकोला फंड कार्यालयाने कारखान्याला सील ठोकले व भाडेतत्वावर कोणी घेतला नाही.
संचालक मंडळानी राजीनामे देवून आपली जबाबदारी झटकली आहे. प्रशासकाची नेमणूक केली. परंतु प्रशासक आलेच नाही. त्यामुळे कारखान्याला कोणी वाली नाही. भाजप सरकारने सहकाराला आर्थिक मदत केली नाही. महाविकास आघाडी सरकारने बंद वसंत कारखाना चालू करण्यासाठी खासदार शरद पवार यांनी सहकार्य करावे, अशी मागणी ऊस उत्पादक व कामगार करीत आहे.
२२ जानेवारीला उमरखेड कृषी उत्पन बाजार समीतीच्या शेडमध्ये सभा झाली.
त्यावेळी ऊस उत्पादक सभासद प्रदीप देवसरकर, बळवंतराव चव्हाण, डॉ.गणेश घोडेकर, संतोष जाधव, व्ही.एम. पंतगराव, बालाजी वानखेडे, गजानन कदम, उत्तम जाधव आदींनी भूमिका मांडली. कारखाना सुरू करण्यासाठी पुसद, महागाव, हदगाव, हिमायतनगर या चारही तालुक्यातील शेतकरी एकत्र येवून निधी जमा करून बंद पडलेला कारखाना सुरू करण्यासाठी ऊस उत्पादक व कामगार संघर्ष करण्याचा निर्णय एकमताने घेतला.