जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 10:15 PM2019-07-03T22:15:12+5:302019-07-03T22:15:32+5:30

जुनीच पेन्शन योजना लागू करा, या प्रमुख मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने बुधवारी तिरंगा चौकामध्ये धरणे दिले. या आंदोलनात शासकीय कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला होता.

Employees' damages for old pension | जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचे धरणे

जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचे धरणे

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यव्यापी आंदोलन : तिरंगा चौकात निदर्शने, शासनाविरुद्ध संताप

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जुनीच पेन्शन योजना लागू करा, या प्रमुख मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने बुधवारी तिरंगा चौकामध्ये धरणे दिले. या आंदोलनात शासकीय कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला होता.
राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने जुनीच पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी संपूर्ण राज्यात हे आंदोलन केले. रिक्त पदे त्वरित भरण्यात यावे, निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्यात यावे. या प्रमुख मागण्यांचा निवेदनामध्ये समावेश होता.
यावेळी राज्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश वैद्य, सरचिटणीस नंदू बुटे, शिक्षक महासंघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर नाकाडे, गजानन देऊळकर, जुनी पेन्शन संघटनेचे नदीम पटेल, मिलिंद सोळंके, शाम दाभाडकर, प्रवीण बहादे, किशोर पोहणकर, श्रीरंग रेकलवार, विजय साबापुरे, नंदकुमार नेटके यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला. यावेळी संघटनेचे पदाधिकारी अ‍ॅड. शाम खंडारे, सचिन शंभरकर उपस्थित होते. कर्मचाºयांनी राज्य शासनाविरुद्ध निदर्शने करून संताप व्यक्त केला.

Web Title: Employees' damages for old pension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.