मारेगावात वेळेपूर्वीच गायब होतात कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:45 AM2021-09-18T04:45:18+5:302021-09-18T04:45:18+5:30
शासनाने कामाला गती येण्यासाठी कार्यालयीन कामाच्या वेळा वाढवून पाच दिवसांचा आठवडा केला. सकाळी ९.४५ ते संध्याकाळी ६.१५ या वेळात ...
शासनाने कामाला गती येण्यासाठी कार्यालयीन कामाच्या वेळा वाढवून पाच दिवसांचा आठवडा केला. सकाळी ९.४५ ते संध्याकाळी ६.१५ या वेळात शासकीय कार्यालये सुरू राहावे, असे स्पष्ट आदेश आहेत; परंतु शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून निर्धारित वेळेचे बंधन पाळले जात नाही. शासकीय कार्यालयातील अनेक कर्मचारी अजूनही जुन्याच पद्धतीने कामकाज चालवीत आहेत. सकाळी ११ वाजताच्या पुढे येतात आणि ४ वाजताच गायब होतात. यातही उपस्थितीच्या वेळात विविध कारणे सांगून हे कर्मचारी खुर्चीवर राहात नाहीत. या कर्मचाऱ्यांत कधीच वेळेचे गांभीर्य आणि शिस्तपालन होत नसल्याचेच पाहायला मिळते. कोरोनाच्या काळापासून तर या कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणखीणच कमी झाल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे कामासाठी वारंवार कार्यालयात चकरा मारून सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून, या कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी उपाययोजना करावी अथवा सहा दिवसांचा आठवडा करावा, अशी मागणी आता सामान्य जनतेतून होत आहे.