नांदुराच्या रोजगार सेवकांनी केली अफरातफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:31 AM2021-06-01T04:31:41+5:302021-06-01T04:31:41+5:30
नांदुरा (ई.) येथे घरकुल लाभार्थी कलुबाई परसराम कांबळे, रुक्माबाई गोदाजी पडघणे व आकाश प्रकाश पठाडे यांच्या खात्यात घरकुलाची रक्कम ...
नांदुरा (ई.) येथे घरकुल लाभार्थी कलुबाई परसराम कांबळे, रुक्माबाई गोदाजी पडघणे व आकाश प्रकाश पठाडे यांच्या खात्यात घरकुलाची रक्कम जमा करण्यासाठी रोजगारसेवक मिलिंद दामू पठाडे यांनी मस्टर भरले होते. ही रक्कम रोजगार हमीतील काम करणाऱ्या मजुरांना देणे अनिवार्य होते; मात्र रोजगार सेवकाने ती रक्कम परस्पर स्वतःची आई कमल दामू पठाडे व पत्नी अर्चना मिलिंद पठाडे यांच्या खात्यात वळती करून हजारो रुपयांचा गैरव्यवहार केला. याबाबत उपसरपंच निकेश मारोती कांबळे यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
ग्रामसेविकेने रोजगार सेवकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. घरकुल लाभार्थ्यांच्या मस्टराबाबत तीन दिवसात खुलासा सादर करण्याची नोटीस बजावली आहे. अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्याची तंबी दिली आहे; मात्र हजारो रुपयांची अफरातफर झाल्याची माहिती समोर आल्याने या प्रकरणाची प्रभारी गटविकास अधिकारी प्रवीणकुमार वानखेडे यांनी तत्काळ सखोल चौकशी करावी, अशी मागणी तक्रारकर्त्यांनी केली आहे.