दत्त चौक रोड परिसराला अतिक्रमणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 05:00 AM2020-11-26T05:00:00+5:302020-11-26T05:00:13+5:30

दहा मीटर रुंदीचा हा मार्ग प्रत्यक्षात पाच मीटरही वाहनधारकांना वापरायला मिळत नाही. एक तर दुकानांचे साहित्य रस्त्यावर आले, त्यापुढे ग्राहकांंचे पार्किंग, त्यापुढे हातगाडीवाल्यांचे अतिक्रमण अशी रस्त्याच्या दुतर्फा अवस्था आहे. त्यामुळे तेथून वाहन काढताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. शहराचे हृदयस्थळ असल्याने तेथे सतत गर्दी पहायला मिळते. अतिक्रमण हे या गर्दीचे प्रमुख कारणे मानले जाते.  

Encroach on Datta Chowk Road area | दत्त चौक रोड परिसराला अतिक्रमणाचा विळखा

दत्त चौक रोड परिसराला अतिक्रमणाचा विळखा

googlenewsNext
ठळक मुद्देनगरपालिकेचे दुर्लक्ष : दुकानांचे साहित्य रस्त्यावर, वाहन पार्किंग वांद्यात, फेरीवाल्यांची गर्दी

  लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नगरपरिषदेने दोन कोटी रुपये खर्चून बांधकाम केलेल्या नेताजी चौक ते संतसेना चौक, पुढे दत्त मंदिर - बसस्थानक पर्यंतच्या सुमारे एक किलोमीटरच्या मार्गावर ठिकठिकाणी अतिक्रमण झाले आहे. 
दहा मीटर रुंदीचा हा मार्ग प्रत्यक्षात पाच मीटरही वाहनधारकांना वापरायला मिळत नाही. एक तर दुकानांचे साहित्य रस्त्यावर आले, त्यापुढे ग्राहकांंचे पार्किंग, त्यापुढे हातगाडीवाल्यांचे अतिक्रमण अशी रस्त्याच्या दुतर्फा अवस्था आहे. त्यामुळे तेथून वाहन काढताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. शहराचे हृदयस्थळ असल्याने तेथे सतत गर्दी पहायला मिळते. अतिक्रमण हे या गर्दीचे प्रमुख कारणे मानले जाते.  यवतमाळ शहरात आर्णी रोड, पांढरकवडा रोड, दारव्हा रोड, धामणगाव रोड अशा सर्वच प्रमुख मार्गांवर अतिक्रमणाची ही समस्या आहे. त्यातही हातगाडीवाल्यांचे अतिक्रमण सर्वाधिक आहे. वाहतूक पोलीस तैनात असूनही या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे शहराचे आरोग्य बिघडले. 

हातगाड्यांचे सर्वाधिक अतिक्रमण 
नेताजी चौक ते संत सेना चौक अर्थात दत्त मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर फळे, भाजीपाला विकणाऱ्या हातगाडी व्यावसायिकांचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात आहे. आधीच व्यावसायिक दुकानाबाहेर, त्याच्या पुढे हातगाड्या अशी अवस्था पहायला मिळते. 

वाहन चालक वाहतूक पोलिसांच्या निशाण्यावर

 दत्त चौक परिसरात वाहनांच्या पार्किंगला जागाच नाही. त्यात तेथे वाहतूक पोलीस तैनात असतात. अशा वेळी दुकानासमोर वाहन पार्क केल्यास ते रस्त्यावर आले असे म्हणून वाहनचालकांना पोलिसांकडून दंडाचे चलान दिले जाते. 

 यवतमाळ शहरात प्रमुख मार्गांवर कुठेच पार्किंगची अधिकृत व्यवस्था नाही. नव्याने बांधलेल्या आर्णी रोडवर तर आणखीच अडचण आहे. फुटपाथच्या बाहेर रस्त्यावर पार्किंग केली जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. 

अतिक्रमण हटाव मोहीम ६ डिसेंबरपूर्वी राबविली जाणार आहे. त्यासाठी पोलिसांना मदत मागण्यात आली आहे. तक्रारी आलेले अतिक्रमण प्राधान्याने उठविले जाणार आहे. कुठे अतिक्रमण असेल तर नागरिकांनी तक्रारी कराव्या. शहरातील सर्व रस्त्यांवरचे वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविले जाणार आहे. दुकानांचे अतिक्रमण असेल तर व्यावसायिकांना त्यासाठी नोटीस बजावली जाणार आहे. 
- राहुल पळसकर
अतिक्रमण विरोधी पथक प्रमुख 

 

Web Title: Encroach on Datta Chowk Road area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.