अतिक्रमणधारकांची मुजोरी !

By admin | Published: November 12, 2016 12:19 AM2016-11-12T00:19:37+5:302016-11-12T00:19:37+5:30

महापालिका आयुक्त हेमंत पवार यांच्या दिशानिर्देशाने शहरात सर्वदूर अतिक्रमणावर गजराज फिरविला जात आहे; ...

The encroachment of the encroachers! | अतिक्रमणधारकांची मुजोरी !

अतिक्रमणधारकांची मुजोरी !

Next

महापालिकेला जुमानेनात : पोलिसांनी राखावा समन्वय
अमरावती : महापालिका आयुक्त हेमंत पवार यांच्या दिशानिर्देशाने शहरात सर्वदूर अतिक्रमणावर गजराज फिरविला जात आहे; तथापि अतिक्रमण निर्मूलन पथकाची पाठ फिरताच ते अतिक्रमण ‘जैसे थे’ होऊ लागले आहेत. दुसरीकडे सायंकाळनंतर या अतिक्रमणधारकांची मुजोरी वाढीस लागली आहे.
श्याम चौकालतच्या नगर वाचनालयासमोरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण काढण्यास पालिका प्रमुखांना यश आले आहे. मात्र सायंकाळनंतर पुन्हा या ठिकाणी मिनाबाजार भरण्यास सुरुवात झाली आहे. पार्किंगच्या व्यवस्थेच्या ठिकाणी पुन्हा सायंकाळपर्यंत हातगाड्या सजू लागल्या आहेत.
आयुक्त पवार यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच अतिक्रमण आणि पार्किंगचा प्रश्न हातात घेतला. त्यांच्या या प्रयत्नाला काहीअंशी यशही आले. मात्र त्याचवेळी फेरीवाल्यांनी पालिकेविरुद्ध उठाव केला. फेरीवाल्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या हॉकर्स झोनचा मुद्दा निकाली काढल्यानंतर फेरीवाल्यांसह अन्य अतिक्रमण उद्ध्वस्त करण्याला मर्यादा आल्या. दुपारच्या सुमारास जि.प. विश्रामगृहालगतच फुडझोन आणि वारंवार हातोडा टाकूनही येथे दुकाने थाटली जातात. त्यामुळे अशा मुजोरीला अटकाव करण्यासह सायंकाळनंतर थाटलेल्या अतिक्रमणावर गजराज फिरविण्याचे आव्हान महापालिकेला पेलायचे आहे. मध्यंतरी एक दोन दिवस सायंकाळनंतर अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. मात्र त्यानंतर पुन्हा कारवाई झाल्याने अतिक्रमणधारक मुजोर झाले आहेत. (प्रतिनिधी)

रस्त्यालगत
अनधिकृत फूडझोन
सायंकाळ ६ नंतर रस्त्यालगत फूडझोन साकारले जातात. यात बसडेपोकडून रुख्मिणीनगरकडे जाणारा मार्ग, काँग्रेसनगर रोड, नवाथे चौक, गाडगेनगर, राधानगर, उड्डाणपूल, पंचवटी, गांधी चौक, अंबादेवी मार्गाचा प्राधान्याने समावेश करावा लागेल. या अतिक्रमणाकडे वाहतूक शाखेने पुरेसे दुर्लक्ष केले आहे. वास्तविक वाहतुकीस अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांचीच आहे.

Web Title: The encroachment of the encroachers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.