वन विभागाची अतिक्रमण हटाओ मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 11:34 PM2018-06-29T23:34:58+5:302018-06-29T23:35:39+5:30

तालुक्यातील महाळुंगी येथील वन विभागाच्या कक्ष क्र. ३२० व शिरपूर बिटमध्ये वनविभागाच्या साडे पंधरा हेक्टर जमिनीवर अतिक्रमण झाले होते. वारंवार सूचना देवूनही अतिक्रमण काढण्यात येत नव्हते.

The encroachment of the forest department is removed | वन विभागाची अतिक्रमण हटाओ मोहीम

वन विभागाची अतिक्रमण हटाओ मोहीम

googlenewsNext
ठळक मुद्देमहाळुंगी : वन जमिनीवरचा ताबा काढला

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : तालुक्यातील महाळुंगी येथील वन विभागाच्या कक्ष क्र. ३२० व शिरपूर बिटमध्ये वनविभागाच्या साडे पंधरा हेक्टर जमिनीवर अतिक्रमण झाले होते. वारंवार सूचना देवूनही अतिक्रमण काढण्यात येत नव्हते. काहींनी तर या जमिनीवर पेरणी केली आहे. अखेर उपवनसंरक्षकांच्या आदेशावरून स्थानिक वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या मदतीने १७ जणांच्या वन जमिनीवरील अतिक्रमण काढून ताबा कायम केला.
अतिक्रमण झालेल्या परिसरात वन विभागाने जमिनीची मोजणी केली. यावरून ही बाब स्पष्ट झाली. संबंधितांना कायदेशीर नोटीसही बजावण्यात आल्या. त्यानंतरही कोणीच जुमानन्यास तयार नव्हते. शेवटी अतिक्रमण झालेल्या जमिनीबाबतचे फाईल उपवनसंरक्षक बी.एन. पिंगळे यांच्यापुढे ठेवण्यात आले. या प्रकरणात सहायक वनसंरक्षक विपीन राठोड यांनी थेट घटनास्थळ गाठले. उत्तर आर्णीतील वन परिक्षेत्र अधिकारी आर.बी. रोडगे यांच्या उपस्थितीत अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविली. सोबतच वन विभागाच्या जमिनीचे क्षेत्र व हद्द कायम केली.
यावेळी वनपाल विजय भोयर, वनरक्षक डी.पी. सपकाळे यांच्यासह उत्तर तथा दक्षिण आर्णीचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पोलीस बंदोबस्तसुध्दा ठेवण्यात आला होता.

Web Title: The encroachment of the forest department is removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.