पुसद शहरातील पुतळ्यांसमोर अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:43 AM2021-04-20T04:43:06+5:302021-04-20T04:43:06+5:30
फोटो पुसद : नगर परिषदेने महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोरील अतिक्रमण काढून एक आठवडा उलटला. मात्र, पुन्हा तेथे अतिक्रमण करण्यात ...
फोटो
पुसद : नगर परिषदेने महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोरील अतिक्रमण काढून एक आठवडा उलटला. मात्र, पुन्हा तेथे अतिक्रमण करण्यात आले. याच्या निषेधार्ह अखिल भारतीय समता परिषदेने सर्व पुतळ्यांसमोर भाजीपाला व फळ विक्रीचे हातगाडे लावून निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरात रस्ते, जागा शिल्लक असताना मुद्दाम महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोरच अतिक्रमण करण्यात आले. यामुळे पुतळ्याची वारंवार विटंबना होत आहे. नगर परिषदेकडून त्याला संरक्षण दिले जात असल्याचा आरोप समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष आत्माराम जाधव यांनी केला आहे.
मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाड यांना अतिक्रमण काढण्याची विनंती केली. मात्र, अद्याप अतिक्रमण काढण्यात आले नाही. रस्त्यावर अतिक्रमण करून भाजीपाला व फळे विकणारे मास्क वापरत नाहीत. सामाजिक अंतर ठेवत नाहीत. कोरोनाविषयी काळजी घेत नाही. यामुळे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच आरोपही त्यांनी केला. काही लोकप्रतिनिधी अतिक्रमण करणाऱ्यांच्या पाठीशी असल्यामुळेच असे प्रकार वारंवार घडत असल्याचा आरोप आत्माराम जाधव यांनी केला.
महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर अतिक्रमण करणारा फळविक्रेता नगर परिषद, महसूल, पोलीस प्रशासन आणि नागरिकांना वरचढ ठरत आहे. या कृतीच्या निषेधार्थ अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने आंदोलनाची हाक दिली आहे.
बॉक्स
सर्व पुतळ्यांसमोर दुकाने लावणार
आता समता परिषदेने धरणे किंवा उपोषण न करता संचारबंदी संपल्यानंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वसंतराव नाईक, महात्मा गांधी, बाबासाहेब मुखरे, सुभाषचंद्र बोस आदींच्या पुतळ्यासमोरच भाजीपाला, फळे आदींचे गाडे लावण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी गरीब नागरिकांना व्यवसाय सुरू करून देण्याचे नियोजन केले. महात्मा फुले पुतळ्यासमोरील अतिक्रमण मुख्याधिकारी, नगरसेवक, आमदार, महसूल व पोलीस प्रशासन यांना मान्य असेल, तर त्यांनी आमचे अतिक्रमण मान्य करावे व आम्ही करणार असलेले अतिक्रमण काढू नये, त्यालाही संरक्षण द्यावे, अशी मागणी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष आत्माराम जाधव यांनी केली.