राज्यपालांच्या मार्गावरील अतिक्रमण काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 11:38 PM2017-12-19T23:38:42+5:302017-12-19T23:40:11+5:30
महामहीम राज्यपाल सी. विद्यासागर राव बुधवारी यवतमाळात येत आहे. त्यानिमित्त नगरपरिषदेने नागपूर मार्गावरील अतिक्रमण काढले. यात मंगळवारी दुपारी तहसील चौक ते शनि मंदिर चौकापर्यंतच्या दुकानांचे शेड काढण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महामहीम राज्यपाल सी. विद्यासागर राव बुधवारी यवतमाळात येत आहे. त्यानिमित्त नगरपरिषदेने नागपूर मार्गावरील अतिक्रमण काढले. यात मंगळवारी दुपारी तहसील चौक ते शनि मंदिर चौकापर्यंतच्या दुकानांचे शेड काढण्यात आले.
शहरातील अंतर्गत रस्ते व प्रमुख मार्ग अतिक्रमणामुळे अतिशय अरुंद झाले आहे. पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहतुकीलाही अडथळा होतो. वाहतूक पोलीस व नागरिकांत यावरून सतत वाद निर्माण होतात. तरीही अद्याप पालिका प्रशासन अतिक्रमणाचा मुद्दा गांभीर्याने घेतला नाही. आता खुद्द राज्यपालच शहरात येत असल्याने त्यांच्या मार्गात येणाºया रस्त्यांना मोकळे करण्याचे काम पालिकेची यंत्रणा करीत आहे.
मंगळवारी दुपारी अतिक्रमण विभागाचे प्रमुख डी.एम. मेश्राम, बाजार विभाग प्रमुख अंबाडेकर, आरोग्य विभाग प्रमुख संदीप गायकवाड यांच्या मार्गदर्शनात आरोग्य निरीक्षक प्रफुल्ल जनबंधू, प्रदीप परतेती, राहुल पळसकर, संदीप गायकवाड, गोविंद देवकते, अशोक मिसाळ यांनी ही मोहीम राबविली.