यवतमाळात अतिक्रमण हटाव मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:00 IST2021-02-18T05:00:00+5:302021-02-18T05:00:11+5:30
यवतमाळ नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी बसस्थानक चौकातील दुकानावर नगर परिषदेचा बुलडोझर चालला. यावेळी या ठिकाणची तीन ते चार दुकाने तोडण्यात आली. यावेळी इतर दुकानदारांनी हा संपूर्ण विषय न्यायालयात असल्याची बाब सांगितली. यामुळे नगर परिषद प्रशासनाने या ठिकाणी असलेले होर्डिंग बोर्ड तोडले तर इतर मोहीम गुरुवारी राबविणार असल्याचे नगर परिषद प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.

यवतमाळात अतिक्रमण हटाव मोहीम
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नगर परिषदेने अतिक्रमण हटविण्याची मोहीम वेगवान केली आहे. मंगळवारपासून सुरू झालेल्या या मोहिमेला आज दुसऱ्या दिवशी दुकानदारांनी कडाडून विरोध केला. यावेळी तहसीलदार आणि मुख्याधिकाऱ्यांनी मध्यस्थी करीत या ठिकाणची कायदेशीर बाजू ऐकून घेतली. यानंतर ही मोहीम थांबविली.
यवतमाळ नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी बसस्थानक चौकातील दुकानावर नगर परिषदेचा बुलडोझर चालला. यावेळी या ठिकाणची तीन ते चार दुकाने तोडण्यात आली. यावेळी इतर दुकानदारांनी हा संपूर्ण विषय न्यायालयात असल्याची बाब सांगितली. यामुळे नगर परिषद प्रशासनाने या ठिकाणी असलेले होर्डिंग बोर्ड तोडले तर इतर मोहीम गुरुवारी राबविणार असल्याचे नगर परिषद प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. या प्रकरणात शिवसेनेचे यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी मोहिमेला विरोध केला. या मागे अदृश्य शक्तीचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला. याच वेळी पर्यायी जागा उपलब्ध करून द्या, अशी मागणीही त्यांनी केली. आजची मोहीम राबविताना नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ, तहसीलदार कुणाल झाल्टे, राहुल पळसकर, गजानन गुल्हाने, नगर परिषद कर्मचाऱ्यांसह पोलिसांचा मोठा ताफा यावेळी उपस्थित होता.