रस्त्यासाठीच्या उपोषणाची अखेर सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 11:00 PM2017-11-19T23:00:59+5:302017-11-19T23:01:10+5:30

येथील मुख्य रस्त्याच्या पुनर्बांधणीकरिता सजग नागरिक मंचचे सदस्य कपिल दरवरे यांनी रविवारी सकाळी १०.३० वाजता चिमुकल्यांच्या हस्ते ज्युस घेऊन उपोषणाची सांगता केली.

The end of fasting for the road | रस्त्यासाठीच्या उपोषणाची अखेर सांगता

रस्त्यासाठीच्या उपोषणाची अखेर सांगता

Next
ठळक मुद्देकेंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचे आश्वासन : पाटणबोरीत विजयी मिरवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क
पाटणबोरी : येथील मुख्य रस्त्याच्या पुनर्बांधणीकरिता सजग नागरिक मंचचे सदस्य कपिल दरवरे यांनी रविवारी सकाळी १०.३० वाजता चिमुकल्यांच्या हस्ते ज्युस घेऊन उपोषणाची सांगता केली. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आश्वासन दिल्यानंतरच या उपोषणाची सांगता झाली.
शनिवारी गावातील सर्र्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन चर्चा केली. सायंकाळी सर्व संघटनाच्या पदाधिकाºयांनी चंद्रपूर येथे जाऊन ना.हंसराज अहीर यांची भेट घेतली. यावेळी अहीर यांनी १५ दिवसानंतर कामाला सुरूवात करण्याची ग्वाही दिली. त्यानंतर अहीर यांनी कपिल दरवरे यांच्याशी संपर्क साधून रस्त्याच्या कामासाठी आश्वासन दिले. त्यानंतर दरवरे यांनी गावकºयांना विश्वासात घेऊन हे उपोषण मागे घेतले.
त्यानंतर रविवारी सकाळी उपोषण मंडपासून गावकºयांनी ढोल ताशांच्या गजरात, फटाके फोडून, मिठाई वाटून विजयी मिरवूणक काढली. कपिल हा २४ वर्षाचा असूनही इतक्या लहान वयात त्याने गटातटाचे राजकारण बाजूला ठेऊन सर्व स्तरातील नागरिकांना, महिलांना एकत्र आणले व युवाशक्तीच्या एकतेचा परीचय दिला. त्याच्या या उपोषणाबद्दल परिसरात त्याचे कौतुक होत आहे.

Web Title: The end of fasting for the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.