जीएस कर्ज घोटाळा अखेर सीबीआयकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 10:12 PM2019-06-19T22:12:07+5:302019-06-19T22:13:37+5:30

येथील जीएस आॅईल या कंपनीने अज्ञात शेतकऱ्यांचे बोगस कागदपत्रे तयार करून त्यांच्या नावावर कोट्यवधी रूपयांच्या कर्जाची उचल केल्याचे प्रकरण उघडकीस आले.दरम्यान, कंपनीच्या संचालकाने पाच वर्षापूर्वी कंपनी बंद करून येऊन पोबारा केला.

At the end of the GS debt scam the CBI | जीएस कर्ज घोटाळा अखेर सीबीआयकडे

जीएस कर्ज घोटाळा अखेर सीबीआयकडे

googlenewsNext
ठळक मुद्देपथक धडकले : शेतकऱ्यांच्या नावे करोडोची उचल

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : येथील जीएस आॅईल या कंपनीने अज्ञात शेतकऱ्यांचे बोगस कागदपत्रे तयार करून त्यांच्या नावावर कोट्यवधी रूपयांच्या कर्जाची उचल केल्याचे प्रकरण उघडकीस आले.दरम्यान, कंपनीच्या संचालकाने पाच वर्षापूर्वी कंपनी बंद करून येऊन पोबारा केला. हे प्रकरण आता ‘सीबीआय’कडे सोपविण्यात आले असून सीबीआयचे अधिकारी मंगळवारी रात्री घोन्सा येथे येऊन गेले. मात्र त्यांना त्या शेतकºयांचा थांगपत्ता लागला नाही.
१० वर्षापूर्वी वणी-भालर रोडलगत जीएस आॅईल नावाची सोयाबीन तेल तयार करणारी फॅक्टरी उभी करण्यात आली. या फॅक्टरीत शेकडो बेरोजगारांना काम मिळाले. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला योग्य भाव मिळू लागला. परंतु हे सर्व औटघटकेचे ठरले. फॅक्टरीतून दोन ते तीन वर्षे तेलाचे उत्पादन झाले. मात्र त्यानंतर कंपनीच्या मालकाने कोट्यवधींचा घोटाळा करून पोबारा केला. अज्ञात शेतकºयांच्या नावावर खोटी कागदपत्र करून कर्जाची उचल करण्यात आली. कंपनीचे दिवाळे निघाल्याने अखेर एका बँकेने कंपनीला सील लावले. घोटाळ्यामध्ये कंपनीच्या संचालकाविरोधात फौजदारी गुन्हेही दाखल झाले होते. आता हा कर्ज घोटाळा सीबीआयकडे सोपविण्यात आला आहे. तालुक्यातील घोन्सा येथील २० व्यक्तींच्या नावावर प्रत्येकी ७० ते ८० लाख रूपयांच्या कर्जाची उचल करण्यात आल्याचे दिसून आले. ज्या व्यक्तीच्या नावे कर्जाची उचल करण्यात आली, त्या व्यक्तीची व त्यांच्या संपत्तीची, कागदपत्रांच्या सत्यतेची चौकशी करण्यासाठी सीबीआयच्या नागपूर शाखेच्या पोलीस निरीक्षक कविता इसनकर ह्या आपल्या सहकाºयासह मंगळवारी रात्री घोन्सा येथे गेल्या. त्यांनी सरपंच व उपसरपंच यांना पत्र देऊन चौकशीतील व्यक्तीच्या संपत्तीविषयक व कागदपत्राविषयीची माहिती मागितली. यामध्ये घोन्सा येथील तानाजी चांदेकर, सुदर्शन बर्वे, बापूराव पोलसवार, लक्ष्मीकांत गड्डमवार, हरीदास उत्तरवार, रमेश रेड्डीवार, अरविंद बोबडे, अविनाश राठोड, नदीम, शिवा, राकेश गेडे, कैलास जिलपेल्लीवार, सुरेश कासावार, बाळू अंबरवार, प्रफुल्ल शेंडे, अनिल पंधरे, जोसेफ, राहुल येलपुलवार, माणिक कडू, कांताराव टिकले या शेतकºयांच्या नावे कर्जाची उचल केली आहे.
मात्र यापैकी एकही व्यक्ती घोन्सा येथील रहिवासी नसल्याचे चौकशीत आढळून आले. बुधवारी भालर येथील विश्रामगृहात उपसरपंच व गावातील पोस्टमास्तरला चौकशीसाठी बोलाविण्यात आले. या सर्व २० व्यक्तीच्या नावे बोगस कागदपत्रे तयार करून हिंगणघाट येथील एका बँकेतून कर्ज उचलण्यात आले आहे. या चौकशीबाबत पोलीस निरीक्षक कविता इसनकर यांना विचारले असता, आम्हाला माहिती देता येत नाही, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

आॅईल मील कंपनीतून भंगार लंपास
भालर रोडवरील जीएस आॅईल कंपनीला सील केल्यानंतर चोरट्यांनी तेथील कोट्यवधी रुपये किंमतीचे भंगार लंपास करण्याचा सपाटा लावला. यंत्राद्वारे लोखंड कापून ते लंपास करण्यात आले. आता तेथे केवळ संरक्षण भिंत व ईमारतीचा ढाचा उभा आहे. दिवाळे निघालेल्या कंपनीने अनेकांचे दिवाळे काढून त्यांना कर्जबाजारी करून ठेवले आहे.

Web Title: At the end of the GS debt scam the CBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.