यवतमाळच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:59 PM2018-03-31T12:59:31+5:302018-03-31T13:12:11+5:30
स्थानिक आझाद मैदानातील क्र ीडा विभागाच्या स्विमींग पूलमध्ये बुडून २१ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजता घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्थानिक आझाद मैदानातील क्रीडा विभागाच्या स्विमींग पूलमध्ये बुडून २१ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजता घडली.
लिखित भास्कर महाजन (२१) रा. देवळी जि. वर्धा असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. लिखित हा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात केमिकल शाखेच्या द्वितीय वर्षाला होता. तो मागील एक महिन्यापासून आझाद मैदानातील शासकीय स्विमींग पुलावर मित्रांसोबत पोहण्यासाठी येत होता. ३१ मार्च असल्याने शनिवारी त्याच्या पासचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे मित्रांसोबत तो वाजवीपेक्षा अधिक वेळ पाण्यात पोहत होता. पोहता-पोहता थकल्याने आधार घेण्यासाठी तो उभा राहिला. मात्र चुकून ज्या भागात स्विमींग पूल खोल आहे, अशा ठिकाणी त्याने आधार घेण्याचा प्रयत्न केला. यातच तो पाण्यात बुडाला. हा प्रकार त्याच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्याला तातडीने पाण्याबाहेर काढले. त्याने बाहेर आल्यानंतर ओकारी केली. गंभीर अवस्थेत महादेव मंदिर समोरच्या खासगी रु ग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगून तेथील डॉक्टरांनी शासकीय रु ग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. शासकीय रु ग्णालयात डॉक्टरांनी लिखितला मृत घोषित केले. या घटनेने त्याच्या सहकाऱ्यांना धक्का बसला. प्रत्येकजण हळहळ व्यक्त करीत होते. लिखित हा मागील महिन्याभरात पोहण्यात बऱ्यापैकी तरबेज झाला होता. लिखित हा महाजन कुटुंबात एकुलता एक मुलगा असल्याने हळहळ व्यक्त होत आहे.