‘जेडीआयईटी’त उद्योजकता जागृती शिबिर

By admin | Published: April 11, 2016 02:38 AM2016-04-11T02:38:02+5:302016-04-11T02:38:02+5:30

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ विद्यार्थी कल्याण विभागांतर्गत येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात उद्योजकता जागृती शिबिर घेण्यात आले.

Entrepreneurship Awareness Camp in JDIET | ‘जेडीआयईटी’त उद्योजकता जागृती शिबिर

‘जेडीआयईटी’त उद्योजकता जागृती शिबिर

Next

यवतमाळ : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ विद्यार्थी कल्याण विभागांतर्गत येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात उद्योजकता जागृती शिबिर घेण्यात आले. छात्रसंघ आणि राष्ट्रीय सेवा योजना पथकातर्फे आयोजित या शिबिरात विविध महाविद्यालयातील २०३ विद्यार्थी सहभागी झाले होते.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या यांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. अतुल बोराडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी सुधीर केंजले, जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक दयाल चव्हाण, एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी रूपेश हिरूलकर, अशोक कांबळे, प्रा. राहुल फाळके आदी उपस्थित होते. रोजगार व स्वयंरोजगार संधी यावर श्यामसुंदर यांनी मार्गदर्शन केले. अशोक कांबळे यांनी उद्योगाची निवड करताना आवश्यक असणाऱ्या बाबी, तर बँक आॅफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक रणजित सिंह यांनी उद्योग उभारणीसाठी असलेल्या योजना आदी बाबींचे मार्गदर्शन केले.
समारोपीय कार्यक्रमप्रसंगी एमसीईडी अमरावतीचे क्षेत्रीय समन्वयक डॉ. अभिराम दबीर यांनी उद्योग स्थापनेसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. प्रसंगी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर होते. आर अँड डी को-आॅर्डिनेटर डॉ. भालेराव आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
शिबिरासाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रगती पवार, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. पद्मिनी कौशिक, प्रा. ए.आर.एम. खान, प्रा. साखरे, रासेयो गट प्रमुख तेजस कापसे, ऐश्वर्या गोटेकर, प्रतीक उरकुडे, संकेत कोल्हे, अश्विन वैद्य, मंगेश सांभारे, कार्तिक शिरे आदींनी पुढाकार घेतला.
शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर यांनी आयोजकांचे कौतुक केले. (वार्ताहर)

Web Title: Entrepreneurship Awareness Camp in JDIET

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.