‘इपीएस-९५’ पेन्शनधारकांचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 09:25 PM2018-07-22T21:25:33+5:302018-07-22T21:26:15+5:30

आपल्या विविध मागण्यांना घेऊन ‘इपीएस-९५’ पेन्शनधारकांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या येथील बसस्थानक चौकातील पुतळ्याला हारार्पण करून मोर्चाद्वारे पेंशनधारक तिरंगा चौकात पोहोचले.

'EPS-9 5' pensioners's request | ‘इपीएस-९५’ पेन्शनधारकांचे निवेदन

‘इपीएस-९५’ पेन्शनधारकांचे निवेदन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आपल्या विविध मागण्यांना घेऊन ‘इपीएस-९५’ पेन्शनधारकांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या येथील बसस्थानक चौकातील पुतळ्याला हारार्पण करून मोर्चाद्वारे पेंशनधारक तिरंगा चौकात पोहोचले.
याठिकाणी उपस्थित पेंशनधारकांना एसटी महामंडळ कर्मचारी निवृत्तांतर्फे भास्कर भानारकर, आर.बी. पवार, सदाशिव शिवणकर, डी.के.भगत, दिघाडे आदींनी मार्गदर्शन केले. ७ आॅगस्ट रोजी दिल्ली येथे नियोजित मोर्चात सहभागाचे आवाहन केले. ‘इपीएस-९५’ पेंशनमध्ये येणाऱ्या १८७ संस्थांमधील सर्व श्रमिक संघ, महाराष्टÑ पेंशनर्स संघटना, निवृत्त कर्मचारी ‘इपीएस-९५’ पेंशन समन्वय समिती, एसटी निवृत्त कर्मचारी संघटना यांच्यातर्फे मोर्चा काढण्यात आला.
जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. सर्व इपीएस पेंशनधारकांना किमान नऊ हजार पेंशन आणि महागाई भत्ता देण्यात यावा, कोशियारी समितीच्या शिफारसी लागू कराव्या, सर्वांना आरोग्यासाठी इएसआय लागू करण्यात यावा, जीवन प्रमाणपत्राची कारवाई स्थानिक बँक शाखेमार्फत केली जावी आदी मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहे. निवृत्त कर्मचारी समन्वय समितीचे व्ही.एम. पतंगराव, पी.के. मुडे, के.डब्ल्यू धोटे,र् ैएस.जी. सायंकार, भास्कर भानारकर, नन्नेश चव्हाण, पी.एम. हरणे, अशोक आसुटकर आदींच्या स्वाक्षºयांचे निवेदन देण्यात आले.

Web Title: 'EPS-9 5' pensioners's request

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.