प्रेयसीला बायपासवर सोडून प्रियकराचे पलायन; 'त्याला' शोधून आणा अशी पोलिसांना घातली गळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 07:35 PM2021-09-15T19:35:05+5:302021-09-15T19:35:57+5:30

Yawatmal News तीन महिन्यांपासून प्रेमबंधनात असलेल्या प्रियकराला घरच्यांसोबत भेटवण्यासाठी जात असताना त्याने अचानक तिला रस्त्यावर सोडून पळ काढल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली.

The escape of a lover leaving his beloved on the bypass; He urged the police to find 'him' | प्रेयसीला बायपासवर सोडून प्रियकराचे पलायन; 'त्याला' शोधून आणा अशी पोलिसांना घातली गळ

प्रेयसीला बायपासवर सोडून प्रियकराचे पलायन; 'त्याला' शोधून आणा अशी पोलिसांना घातली गळ

Next
ठळक मुद्देतीन महिन्यांची प्रेमकहाणी

 लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : घरच्या परिस्थितीला सावरण्यासाठी शहरालगतच्या गोधनी येथील तरुणीने पुण्याला जाऊन कामधंदा शोधण्याचा प्रयत्न केला, यात तिला यश मिळाले. तिने सलग तीन महिने गावाकडे न येता आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले. यातच तिचे सहकाऱ्यासोबत सूत जुळले. दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. लग्नापूर्वी कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी प्रियकराला घेऊन ती गावी आली. त्याने बायपासवर गाडी उभी करून तिला उतरविले व पोबारा केला. (The escape of a lover leaving his beloved on the bypass; He urged the police to find 'him')

 

प्रियकराने फसवणूक केल्याचे लक्षात येताच प्रेयसीचे अवसान गळाले. पुणे ते यवतमाळ प्रवास करताना ती त्याच्यासोबतच्या भावी आयुष्याची स्वप्न गुंफत आली होती. गावाजवळ येताच त्याने लाडिकपणे तिला कुटुंबीयांच्या भेट घेण्यास पाठवून स्वत: पळून गेला. हा धक्का तिला सहन झाला नाही. एका क्षणात तिने गुंफलेल्या स्वप्नाला वास्तवाची चपराक बसली. तीन महिन्यांपासून तो तिच्यासोबत राहून तिला वेगवेगळे स्वप्न दाखवून आपली हौस पूर्ण करीत होता. या वास्तवाची जाणीव झाल्यानंतर तिने थेट अवधूतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. ती पोलिसांना एकच विनवणी करू लागली, काहीही करा माझ्या प्रियकराला शोधून आणा व त्याच्यासोबत माझे लग्न लावून द्या. या अजब प्रेमकहाणीत आपण कशी मदत करायची, असा प्रश्न पोलिसांनाही पडला. तक्रार नोंदवायची नाही आणि प्रियकराला पकडायचे हा पेच त्यांच्यापुढे निर्माण झाला.

भावनिकतेपुढे पोलीसही हतबल

प्रियकराविरुद्ध कुठलीच कारवाई करू नका, केवळ त्याला आणून माझा संसार उभा करून द्या, अशी गयावया ती करू लागली. या प्रेमकहाणीचा नेमका पुढील भाग काय असणार हे अजून तरी स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी पुढाकार घेतल्यास त्या प्रियकराला शोधणे कठीण नाही. तूर्त मात्र ती आपल्या पळालेल्या प्रियकराच्या विरहात शोकमग्न आहे.

Web Title: The escape of a lover leaving his beloved on the bypass; He urged the police to find 'him'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.