वाढोणाची सूतगिरणी सुरू होण्यापूर्वीच अवसायनात

By admin | Published: August 29, 2016 12:59 AM2016-08-29T00:59:07+5:302016-08-29T00:59:07+5:30

तालुक्याच्या वाढोणाबाजार येथील प्रस्तावितच सूतगिरणी अवसायनात निघाली आहे. सहायक निबंधक अ.श. उल्हे यांची अवसायक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Even before the start of growth, | वाढोणाची सूतगिरणी सुरू होण्यापूर्वीच अवसायनात

वाढोणाची सूतगिरणी सुरू होण्यापूर्वीच अवसायनात

Next

सहायक निबंधक अवसायक : २५ वर्षांपूर्वीचे स्वप्न भंगले
के.एस. वर्मा  राळेगाव
तालुक्याच्या वाढोणाबाजार येथील प्रस्तावितच सूतगिरणी अवसायनात निघाली आहे. सहायक निबंधक अ.श. उल्हे यांची अवसायक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी या संस्थेचे संपूर्ण दप्तर ताब्यात घेतले आहे. संस्थेकडून कोणाचीही देणी वा घेणी असल्यास पुराव्यासह लेखी मागणी करण्याबाबतची सूचना अलीकडेच बजावण्यात आली आहे. ही संस्था सुरू होण्यापूर्वीच २५ वर्षांपूर्वीचे स्वप्न भंगले आहे.
सन १९९२ मध्ये राळेगाव तालुक्यात सहकारी सूतगिरणी उभी करण्यासाठी दीपक एंबडवार यांनी मुख्य प्रवर्तक म्हणून पुढाकार घेतला होता. त्या काळात १७५ सभासदांकडून प्रत्येकी दोन हजार रुपयांचा शेअर याप्रमाणे निधी गोळा करण्यात आला. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वाढोणाबाजार शाखेत हा निधी जमा करण्यात आला. सूतगिरणी उभी व्हावी यासाठी एंबडवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी खूप प्रयत्न केले.
राळेगाव तालुक्याचे संपूर्ण सहकार क्षेत्र व राजकीय क्षेत्र यावर त्याकाळी एंबडवार गटाचा ताबा होता. सक्षम विरोधक त्या काळात त्यांना नव्हते. तद्वतच नानाभाऊ एंबडवार दोन-अडीच वर्षे वन व महसूलमंत्री होते. त्यामुळे सूतगिरणी स्थापन करण्याकरिता अनुकूल वातावरण होते. सूतगिरणीकरिता सुरुवात झाली. मात्र त्यानंतर प्रयत्नात सातत्य राखण्याऐवजी शिथिलता येत गेली. कालांतराने राजकारणात एंबडवार मागे पडले. हळूहळू सूतगिरणी हा विषय विस्मरणात गेला.
यवतमाळ जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सूतगिरणीकरिता प्रयत्न झाले. बाजूच्याच कळंब व वणी येथेही तसा प्रयत्न झाला. पण जिल्ह्यात अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी सूतगिरण्या उभ्या राहू शकल्या नाही. वाढोणाबाजार येथील सूतगिरणीही त्याच मार्गावर गेली. साधी सूतगिरणीसाठी जागा खरेदी करण्याची सुरुवातही त्या काळी होवू शकली नाही. शेतकऱ्यांचे, भागधारकांचे, जनतेचे, बेरोजगारांचे त्याकाळी पाहिलेल्या एका स्वप्नाचा चुराडा याप्रमाणे झाला. याचबरोबर निकट भविष्यातही या व अशाच कोणत्याही मोठ्या सहकार प्रकल्पाची आशा संपुष्टात आली आहे.
संचालक वस्त्रोद्योग तथा अतिरिक्त निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र शासन नागपूर यांच्या आदेशानुसार वाढोणाबाजारची सहकारी सूतगिरणी अंतिमत: अवसायनात गेलेली आहे. तशा नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत. संस्था उभी होण्यापूर्वीच अवसायनात निघाल्यामुळे अनेकांचा स्वप्नभंग झाला आहे.

Web Title: Even before the start of growth,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.