अखेर संपूर्ण जिल्हाच दुष्काळग्रस्त घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 10:04 PM2018-12-31T22:04:00+5:302018-12-31T22:04:22+5:30

निसर्गाच्या लहरीपणाने यावर्षी खरिपाच्या हंगामाला मोठा फटका बसला. यामुळे कापूस, सोयाबीन आणि तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महसूल विभागाच्या ‘रँडमली’ पीक सर्वेक्षणातून ही बाब पुढे आली. याचा परिणाम अंतिम पैसेवारीवर झाला. जिल्ह्याची पीक पैसेवारी ४७ टक्केच्या घरात आली आहे. सर्वच १६ तालुक्यांची पैसेवारी ५० टक्केच्या आत आहे. यामुळे महसूल प्रशासनाच्या लेखी संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर झाला आहे.

Eventually the entire district was declared drought-prone | अखेर संपूर्ण जिल्हाच दुष्काळग्रस्त घोषित

अखेर संपूर्ण जिल्हाच दुष्काळग्रस्त घोषित

Next
ठळक मुद्देमहसूलचे शिक्कामोर्तब : अंतिम पैसेवारी ४७ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : निसर्गाच्या लहरीपणाने यावर्षी खरिपाच्या हंगामाला मोठा फटका बसला. यामुळे कापूस, सोयाबीन आणि तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महसूल विभागाच्या ‘रँडमली’ पीक सर्वेक्षणातून ही बाब पुढे आली. याचा परिणाम अंतिम पैसेवारीवर झाला. जिल्ह्याची पीक पैसेवारी ४७ टक्केच्या घरात आली आहे. सर्वच १६ तालुक्यांची पैसेवारी ५० टक्केच्या आत आहे. यामुळे महसूल प्रशासनाच्या लेखी संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर झाला आहे.
संपूर्ण जिल्ह्यात नऊ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी करण्यात आली होती. यामध्ये सर्वाधिक पाच लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आली. प्रारंभी उत्तम अवस्थेत असलेली कपाशी पावसाने पाठ फिरवल्याने हातातून गेली. याचा कापूस उत्पादनाला मोठा फटका बसला. एक ते दोन क्विंटलच्या कापूस उताऱ्यावरच शेतकºयांना समाधान मानावे लागले. दिवाळीनंतर गुलाबी बोंडअळीने हल्ला चढविला. यामुळे फरदडचे उत्पादनही शेतकºयांना घेता आले नाही.
सोयाबीनच्या बाबतीत असेच घडले. अडीच लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. अपुºया पावसाने सोयाबीनच्या शेंगा वाळल्या. त्याला उत्तम असा उताराच आला नाही. यामुळे सोयाबीनचा लागवड खर्चही निघाला नाही. सोयाबीन उत्पादकला याची मोठी किंमत चुकवावी लागली. तुरीच्या पिकावर शेतकºयांची आशा होती. मात्र तुरीचे खराटेच झाले. धुवारी, अवेळी आलेला पाऊस, अळीचे आक्रमण आणि कडाक्याच्या थंडिने तुरीचा बार जळला. शेंगा वेळेपूर्वीच वाळल्या. जिल्ह्यातील अर्ध्या अधिक शेतकºयांनी तुरीची सोंगणीच केली नाही. इतकी वाईट अवस्था तूर उत्पादक शेतकºयांची आहे. एकंदरीत सर्वच पीक हातातून गेल्याने शेतकºयांवर मोठे संकट कोसळले आहे. आता पुढील सहा महिन्यात कुठलेही पीक हातात नाही. दुसºयांची देणी बाकी आहे. या स्थितीत कुटुंब चालवायचे कसे, हा गंभीर प्रश्न शेतकरी कुटुंबापुढे उभा आहे.
तात्काळ उपाययोजना हव्या
दुष्काळी स्थितीतून बाहेर पडण्यासाठी जिल्ह्यात ठोस उपाययोजनांची गरज आहे. विशेष म्हणजे, शेतीला जोडधंदा असला तरच शेतकरी अशा स्थितीत तग धरणार आहे. सलग चौथ्या वर्षी जिल्ह्यावर दुष्काळी छाया पडली. यामुळे शेतकरी पार खचला आहे.
आता नऊ नव्हे १६ तालुक्यांंना दुष्काळी सवलती
सुधारीत आणेवारीमध्ये ९ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले होते. सात तालुक्यांनी महसूल प्रशासनाच्या सर्वेक्षणावर आक्षेप नोंदवित संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी केली होती. आता अंतिम पैसेवारीमध्ये सर्व १६ तालुके दुष्काळाच्या यादीत आले आहेत. यामुळे १६ तालुक्यांना दुष्काळी मदतीचा लाभ मिळणार आहे.

Web Title: Eventually the entire district was declared drought-prone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.