अखेर राष्ट्रवादीने कोंडी फोडली

By admin | Published: July 14, 2014 01:34 AM2014-07-14T01:34:45+5:302014-07-14T01:34:45+5:30

भाजप नगरसेवकांनी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर

Eventually, the NCP broke down | अखेर राष्ट्रवादीने कोंडी फोडली

अखेर राष्ट्रवादीने कोंडी फोडली

Next

भाजपावर शरसंधान : आघाडीचाच नगराध्यक्ष, रात्रभर घडामोडी
यवतमाळ
: भाजप नगरसेवकांनी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शहरात भाजपचाच नगराध्यक्ष व्हावा अशी भूमिका घेतली होती. शहर विकास आघाडीतील राष्ट्रवादीची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू होता. राष्ट्रवादीनेही पालिकेतील दिग्गज आणि जेष्ठ सदस्यांचे नाव समोर केले. तसेच शनिवारी दुपारी भाजपच्या बैठकीत काही सदस्यांनी आघाडीचे नेते ठरवतील त्याच उमेदवाराला पाठिंबा राहील असे स्पष्ट केले. त्यामुळे राष्ट्रवादीने अनेकांच्या मनसुब्यावर पाणी फेरत कोंडी फोडली.
सर्वपक्षीय नगरसेवकांची शनिवारी रात्री काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या घरी उशिरापर्यंत बैठक झाली. यात संख्याबळाची चाचपणी घेण्यात आली. आर्थिक अडचण आल्याने ही बैठक कोणताच निर्णय न होता संपली. या बैठकीवर लक्ष ठेऊन असलेल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराने नेते प्रभावहीन ठरत असल्याचे लक्षात येताच सूत्र हाती घेतेले. काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या घरून बाहेर आलेल्या नगरसेवकांना आपल्या बाजूने वळविले. तब्बल २४ सदस्य या उमदेवाराच्या संपर्कात आहेत, शिवाय येईल त्याला सामावून घेण्याची भूमिका त्या उमेदवाराने घेतली आहे. तसेच या उमेदवाराला नगराध्यक्षपदासाठी समर्थन देण्याचा शब्द पालिकेतील दिग्गज नेत्याने दिला आहे. या दोलायमान स्थितीत काँग्रेस श्रेष्ठीकडून कोणताच आदेश आला नाही. त्यांची भूमिका काय राहते याकडे लक्ष लागले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
घोडेबाजार तेजीत
नगराध्यक्षपदासाठीचा घोडेबाजार जोरात सुरू झाला आहे. अधिक वजन ठेवणाऱ्यांच्या बाजूने जाण्याची अनेकांची तयार आहे. काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या घरी अध्यक्ष - उपाध्यक्षाचे नाव निश्चित करण्यात आले होते. मात्र पैसे कोण लावणार यावरून बोलणी फिस्कटली. १५ जुलै रोजी नगराध्यक्ष पदासाठी नामांकन दाखल करावयाचे असल्याने त्यापूर्वीच संख्याबळाची गोळाबेरीज केली जात आहे.
‘त्या’ बैैठकीनंतर फिरला निर्णय
नगरपरिषदेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेल्या नेत्याच्या घरी शुक्रवारी रात्री भाजप नेत्याची बैैठक झाली. यानंतरच भाजपची भूमिका बदलली शहर विकास आघाडीचा नगराध्यक्ष करण्याची मागणी पुढे आली. त्यानंतर राजकीय समिकरणाला कलाटणी मिळाली.

Web Title: Eventually, the NCP broke down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.