दारव्हा फार्मसी कॉलेजचा उत्कृष्ट निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:50 AM2021-09-09T04:50:24+5:302021-09-09T04:50:24+5:30
प्रथम वर्षात श्रृती जयस्वाल ८८.४६ टक्के गुण घेऊन प्रथम आली. नरेश गोरे ८६.९, कामाक्षी इंगोले ८५.५२, ऋतुराज जाधव ८४.९१, ...
प्रथम वर्षात श्रृती जयस्वाल ८८.४६ टक्के गुण घेऊन प्रथम आली. नरेश गोरे ८६.९, कामाक्षी इंगोले ८५.५२, ऋतुराज जाधव ८४.९१, सर्वेश लवंगे ८४.८२, चेतन सत्रे ८३, ऋषिकेश गुल्हाने ८२.८२, तर कुणाल इंगोले याने ८१.७३ टक्के गुण मिळविले.
द्वितीय वर्षात सारंग मोरे ९२.२० टक्के गुण घेऊन प्रथम आला. श्रेया गुल्हाने ८८.८०, कांचन गौतम ८५.४०, दीपशिखा पवार ८५.२०, सफिना फातेमा ८४.६०, मसरत फातेमा ८४.५०, योगेश रोडगे ८२.७०, तर विवेक इंगोले ८१.५० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य अविनाश जीद्देवार, प्रा.एस.यू. नेमाडे, प्रा.आर.जी. भोरे, प्रा.पी.जी. शेळके, प्रा.कल्याणी पोच्छि, प्रा.अक्षय कसंबे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिले. गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे, सदस्य राहुल ठाकरे, व्यवस्थापक अशोक ठाकरे यांनी कौतुक केले.
बॉक्स
बी.फार्म.पदवी अभ्यासक्रमाची सुविधा
या संस्थेच्या बी.फार्म. कोर्सला फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, महाराष्ट्र शासन तंत्रशिक्षण संचालक व डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे याच ठिकाणी आता पुढील बी.फार्म.पदवी शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे.