तुरीच्या जाचक अटीतून सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 11:25 PM2018-02-10T23:25:50+5:302018-02-10T23:26:04+5:30
तुरीला आंतरपीक न धरता संपूर्ण क्षेत्र म्हणून ग्राह्य धरण्याचे आदेश मार्केटिंग फेडरेशनकडे पोहोचले आहेत. यामुळे तूर उत्पादकांपुढील एक अडसर दूर झाला आहे. तर एकरी किती क्विंटल तूर खरेदी करायची, याबाबत फेरनिर्णय घेतला जाणार आहे.
यवतमाळ : तुरीला आंतरपीक न धरता संपूर्ण क्षेत्र म्हणून ग्राह्य धरण्याचे आदेश मार्केटिंग फेडरेशनकडे पोहोचले आहेत. यामुळे तूर उत्पादकांपुढील एक अडसर दूर झाला आहे. तर एकरी किती क्विंटल तूर खरेदी करायची, याबाबत फेरनिर्णय घेतला जाणार आहे. यामुळे तूर उत्पादकांची शासकीय कार्यालयाकडे जाणारी तूर थांबली आहे.
जिल्ह्यातील ११ शासकीय केंद्रांवर तूर खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. या केंद्रावर आतापर्यंत २९३ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. काही जाचक अटींमुळे अनेक शेतकऱ्यांनी नंबर लागल्यानंतरही केंद्रात तूर नेली नाही. सोमवारनंतर क्विंटलची मर्यादा वाढण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील आठवड्यापासून खरेदीला गती येण्याची शक्यता आहे.
महागाव, बोरी केंद्र विचाराधीन
पालकमंत्री मदन येरावार यांनी पुढाकार घेत महागाव आणि बोरी अरब केंद्र सुरू करण्यासठी वरिष्ठ पातळीवर बोलणी केली आहे. यामुळे हे केंद्र लवकर सुरू होण्याची शक्यता वाढली आहे. इतर केंद्रांवरील ताण काही अंशी कमी होण्यास मदत होणार आहे.