परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा
By admin | Published: September 15, 2015 05:20 AM2015-09-15T05:20:59+5:302015-09-15T05:20:59+5:30
अमरावती परिक्षेत्रातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा कर्तव्य मेळावा येथील पोलीस मुख्यालयात आयोजित
यवतमाळ : अमरावती परिक्षेत्रातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा कर्तव्य मेळावा येथील पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आला आहे. उद्घाटन सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या हस्ते सोमवारी झाले. दोन दिवसीय या मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी अमरावती ग्रामीण, वाशिम, बुलडाणा, अकोला, यवतमाळ जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पथसंचलन केले.
या मेळाव्यात साइन्टीफीक अॅन्ड टू इन्व्हेस्टीगेशन कॉम्पिटेशन, फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी, अॅन्टीसबोटेज चेकिंग, कॉम्प्युटर अव्हेरनेस आणि डॉग स्कॉड आदी स्पर्धांचा समावेश आहे. यात अमरावती परिक्षेत्रातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी स्पर्धक सहभागी झाले आहेत.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सेवानिवृत्त अपर पोलीस अधीक्षक सोने, यवतमाळ शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार कुळकर्णी, पोलीस निरीक्षक वडगावकर, पोलीस उपनिरीक्षक धांडे, ढाके, मधुकर तोडसाम, केने, पोकडे, डॉ.सचिन गाडगे, डॉ.कुचेवार, सहायक पोलीस निरीक्षक नक्षणे, अॅड. मिलिंद भगत, अॅड.अरुण मोहोड, टौलारे, वगारे, अजिंक्य नागरगोजे, इम्रान खान आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. पोलीस कर्तव्य मेळाव्याचा उद्देश सांगण्यात आला. या प्रसंगी पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) डॉ.काकासाहेब डोळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जिल्हा पोलीस शाखेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)