प्रायोगिक तत्त्वावर समाज कल्याणची अभ्यासिका

By admin | Published: May 30, 2016 12:16 AM2016-05-30T00:16:09+5:302016-05-30T00:16:09+5:30

स्पर्धा परीक्षेत मागास विद्यार्थी मागे पडतात. अनेकांना स्पर्धा परीक्षा देण्याची इच्छा असतानाही परीक्षेची तयारी करता येत नाही.

Experimental Principles on Social Welfare | प्रायोगिक तत्त्वावर समाज कल्याणची अभ्यासिका

प्रायोगिक तत्त्वावर समाज कल्याणची अभ्यासिका

Next

पहिला प्रयोग : १६ पंचायत समितीत राबविला जाणार उपक्रम
रूपेश उत्तरवार  यवतमाळ
स्पर्धा परीक्षेत मागास विद्यार्थी मागे पडतात. अनेकांना स्पर्धा परीक्षा देण्याची इच्छा असतानाही परीक्षेची तयारी करता येत नाही. म्हणून समाजकल्याण विभागाने अभ्यासिकेचा प्रयोग राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती आणि व्हीजेएनटीच्या विद्यार्थ्यांचा समावेश राहणार आहे. या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका नि:शुल्क राहणार आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेने अभ्यासिकेचा पहिला प्रयोग राबविण्यास प्रारंभ केला आहे.
यवतमाळ जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने सेस फंडाच्या राखीव निधीतून अभ्यासिका वर्ग राबविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या तळमजल्यावरच अभ्यासिका वर्ग उघडण्यात आला आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेकरिता लागणारे सर्व पुस्तक उपलब्ध करण्यात आले आहेत. यासोबतच सर्व वृत्तपत्र, चांगल्या प्रकाशनाचे पुस्तक ठेवण्यात आले आहेत.
सकाळी ७ पासून ते सायंकाळ ७ पर्यंत हा अभ्यासिका वर्ग खुला ठेवण्यात येणार आहे. यानंतर पंचायत स्तरावर अथवा मध्यवस्तीत जागा उपलब्ध होणाऱ्या ठिकाणी अभ्यासिका वर्ग सुरू होणार आहे. यामुळे तालुका स्तरावरही विद्यार्थ्यांना अभ्यासिका वर्गात स्पर्धा परीक्षेची तयारी करता येणार आहे.

विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी म्हणून अभ्यासिका वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रायोगिक तत्वावर जिल्हा परिषदेत हा प्रयोग राबविण्यात आला. यानंतर पंचायत समिती स्तरावर तो राबविता येणार आहे.
- जया राऊत, समाजकल्याण अधिकारी, यवतमाळ

Web Title: Experimental Principles on Social Welfare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.