जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात तज्ज्ञांचे व्याख्यान
By Admin | Published: September 21, 2015 02:19 AM2015-09-21T02:19:29+5:302015-09-21T02:19:29+5:30
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘रिसेंट अॅडव्हान्समेंट्स इन वायरलेस कम्युनिकेशन अँड अपॉर्च्यूनिटीस् फॉर इंजिनिअर्स इन टेलिकॉम सेक्टर्स’ या विषयावर व्याख्यान घेण्यात आले.
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘रिसेंट अॅडव्हान्समेंट्स इन वायरलेस कम्युनिकेशन अँड अपॉर्च्यूनिटीस् फॉर इंजिनिअर्स इन टेलिकॉम सेक्टर्स’ या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. परमाणु व दूरसंचार विभागातील इटा क्लब आणि आयईटीई स्टुडंट फोरमद्वारा आयोजित व्याख्यानप्रसंगी मार्गदर्शक म्हणून ए.आर. सावतकर लाभले होते. मंचावर प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर, विभाग प्रमुख डॉ. संजय गुल्हाने, इटा व आयएफएस समन्वयक प्रा. पंकज पंडित, विद्यार्थी प्रमुख श्रेयस भुयार आदी उपस्थित होते.
भारत संचार निगम लि.चे वरिष्ठ महाप्रबंधक सावतकर यांनी वायरलेस कम्युनिकेशनच्या विविध माध्यमांची सविस्तर माहिती देतानाच मोबाईलच्या सर्व जनरेशनविषयी मार्गदर्शन केले. दूरसंचार विभागातील खासगी आणि शासकीय नोकरी संदर्भातही त्यांनी सांगितले. संचालन शैलजा तेलंग यांनी तर आभार प्रा. पंकज पंडित यांनी मानले. यशस्वीतेसाठी इटा व आयईटीई स्टुडंट फोरम कार्यकारिणीने पुढाकार घेतला. व्याख्यानाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा आणि प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर यांनी आयोजकांचे कौतुक केले. (वार्ताहर)