‘जेडीआयईटी’मध्ये तज्ज्ञांचे व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 09:57 PM2018-03-08T21:57:25+5:302018-03-08T21:57:25+5:30
स्थानिक जवाहरलाल दर्डा इंस्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटतर्फे ‘जागतिक स्तरावरील पाईपिंग टेक्नॉलॉजीचे महत्त्व व नोकरी व्यवसायाच्या संधी’ या विषयावर तज्ज्ञांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : स्थानिक जवाहरलाल दर्डा इंस्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटतर्फे ‘जागतिक स्तरावरील पाईपिंग टेक्नॉलॉजीचे महत्त्व व नोकरी व्यवसायाच्या संधी’ या विषयावर तज्ज्ञांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
मुंबई येथील डिपार्टमेंट आॅफ सेल्फ डेव्हलपमेंट अँड लर्निंग, एशियन अॅकेडमी आॅफ प्रोफेशनल ट्रेनिंगचे विभाग प्रमुख प्रमोद देशमुख यांनी या व्याख्यानात सध्या देशात असलेली कच्च्या तेलाची कमतरता, त्याची देखभाल, साठवणूक व त्या अनुषंगाने पाईपिंग टेक्नॉलॉजीचे महत्त्व विषद केले. विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच पाईपिंग टेक्नॉलॉजीमध्ये नोकरी व व्यवसायाच्या संधीची माहिती दिली. अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती मिळते. महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशनतर्फे (मेसा) या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. विभागातील अंतिम वर्षाचे सर्व विद्यार्थी व्याख्यानाला उपस्थित होते.
संचालन आतिफ शेख यांनी केले. आभार प्रा. महेश गोरडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी विभाग प्रमुख डॉ. अतुल बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मेसा समन्वयक प्रा. महेश गोरडे, विद्यार्थी समन्वयक जित सेठ, उपसमन्वयक आकाश जगताप, अश्विन वैद्य, ध्रुव आनंदपारा, सुमित शुक्ला, नीलेश जयस्वाल व चमूने सहकार्य केले. डॉ. विवेक गंधेवार, डॉ. सचिन भालेराव यांचे मोलाचे योगदान लाभले.
या आयोजनाबद्दल जेडीआयईटीचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर यांनी कौतुक केले.