नवजात बाळाची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2021 11:20 AM2021-10-01T11:20:22+5:302021-10-01T11:28:17+5:30

नवजात बाळाची विक्री करणाऱ्या टोळीस रंगेहात पकडण्यात आले आहे. या बाळाचा साडेतीन लाख रुपयात सौदा करण्यात आला होता. यवतमाळ व अकोला येथील बाल कल्याण समितीच्या अध्यक्षांनी आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी स्टिंग ऑपरेशनद्वारे योजना आखून प्रकरणाचा पर्दाफाश केला.

Exposed gang selling newborn baby | नवजात बाळाची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

नवजात बाळाची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

googlenewsNext
ठळक मुद्देस्टिंग ऑपरेशनद्वारे सत्य आले समोर

यवतमाळ  : बाळ दत्तकसाठी उपलब्ध आहे, असा मेसेज जिल्ह्यात व्हायरल झाल्यापासून ३६ तासात स्टिंग ऑपरेशन करून १५ दिवसाच्या मुलीची विक्री करणाऱ्या टोळीस अटक करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे बाल कल्याण समिती अध्यक्ष यांनी स्वतः डमी पालक बनून ही घटना पुढे आणली आहे. तसेच अकोला आणि यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यांच्या बाल संरक्षण  यंत्रणांनी योग्य समन्वय साधत गुरुवारी रात्री बाळालाही ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी शुक्रवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 बेटी फाऊंडेशन संस्थेने १५ दिवसाचे बाळ दत्तक देण्यास उपलब्ध आहे असा संदेश सोशल मीडियावर व्हायरल केला. सदर मेसेज अकोला येथील बाल कल्याण समितीच्या अध्यक्षांनी वाचल्यावर त्यांनी व्हायरल मेसेजची खात्री करण्यासाठी डमी पालक सदर संस्थेला फोन केला. तसेच महिला व बालकल्याण आयुक्त यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर यवतमाळ व अकोला येथील बाल कल्याण समितीच्या अध्यक्षांनी आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी स्टिंग ऑपरेशनची योजना आखली. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शांआखाली  डमी पालक म्हणून विक्री करणाऱ्या संस्थेला बाळ विकत घेण्याची योजना आखली. 

त्यानुसार गुरुवारी रात्री अवैध बाळ दत्तक व विक्री करण्याची प्रक्रिया सुरू असताना, या १५ दिवसाच्या मुलीस प्रत्यक्ष स्टिंग ऑपरेशन करून अकोला व यवतमाळ जिल्ह्यातील बाल न्याय यंत्रणेद्वारे कारवाई करून ताब्यात घेण्यात आले. तसेच संबंधित बाळाचे आई-वडील, आणि यात सहभागी बेटी फाउंडेशनच्या सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.  तसेच बाळाला ताब्यात घेण्यात आले असून बाललगृहात ठेवण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्याच्या बाल कल्याण समिती  अध्यक्ष पल्लवी कुलकर्णी, दोन्ही जिल्ह्यातील बाल संरक्षण यंत्रणा, पोलीस विभाग यांच्यामुळे हे स्टिंग ऑपरेशन यशस्वी झाले आहे. कारवाई दरम्यान यवतमाळ बाल कल्याण समिती अध्यक्ष अडव्होकेट सुनील घोडेस्वार, जिल्हा परिविक्षा अधिकारी  गजानन जुमळे, अकोला जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, सामाजिक कार्यकर्त्या वनिता शिरफुलें, रविंद्र गजभिये महिला व बाल विकास कर्मचारी, ठाणेदार व  सर्व पोलीस टीम उपस्थित उपस्थित होती,

या कारवाईसाठी कार्यक्रम व्यवस्थापक, बिरसिस मॅडम, जिमबा मरसाळे  व  ज्योती कडू यांनी महत्वाची भूमिका बजावली.

Web Title: Exposed gang selling newborn baby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.