हद्द वणी एसडीपीओंची, धाड पांढरकवड्यातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 10:20 PM2017-11-27T22:20:15+5:302017-11-27T22:20:43+5:30

वणी एसडीपीओंच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या आंतरराज्यीय जुगार अड्ड्यावर धाड घालण्यासाठी लगतच्या पांढरकवडा एसडीपीओंना पाठविले गेल्याने जिल्हा पोलीस प्रशासनाने वणी एसडीपीओंवर अविश्वास दाखविल्याची चर्चा पोलीस दलात ऐकायला मिळते आहे.

Extension of the SDPs, forage from the white box | हद्द वणी एसडीपीओंची, धाड पांढरकवड्यातून

हद्द वणी एसडीपीओंची, धाड पांढरकवड्यातून

Next
ठळक मुद्देआंतरराज्यीय जुगार अड्डा : पोलीस प्रशासनाला लिकेजेसची भीती, आता कारवाई कुणावर ?

आॅनलाईन लोकमत
वणी : वणी एसडीपीओंच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या आंतरराज्यीय जुगार अड्ड्यावर धाड घालण्यासाठी लगतच्या पांढरकवडा एसडीपीओंना पाठविले गेल्याने जिल्हा पोलीस प्रशासनाने वणी एसडीपीओंवर अविश्वास दाखविल्याची चर्चा पोलीस दलात ऐकायला मिळते आहे.
दोन दिवसांपूर्वी पाटण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुर्दापूरचा आंतरराज्यीय जुगार अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला. वास्तविक हे स्थळ वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्या कार्यक्षेत्रात येणारे आहे. नियमानुसार त्यांच्यावर धाडीची जबाबदारी सोपविणे अपेक्षित होते. परंतु वणीत खबर पोहोचल्यास कुणाकडून लिक होण्याची भीती पोलीस प्रशासनाला असावी. म्हणूनच की काय या धाडीची जबाबदारी पांढरकवडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांच्यावर सोपविली गेली. सोबतीला जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकातील काही कर्मचारीही दिले गेले. वणी एसडीपीओच्या हद्दीत पांढरकवडा एसडीपीओंनी धाड घालून भल्या मोठ्या आंतरराज्यीय जुगार अड्ड्याचा पर्दाफाश केला. या अड्ड्यावरून सुमारे ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तेलंगणा-आंध्रातील २३ जुगाºयांना अटक करण्यात आली.
पाटणचा हा जुगार अड्डा वणी उपविभागातील पोलिसांच्या मूक संमतीने चालू असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळेच धाडीची जबाबदारी वणी ऐवजी पांढरकवडा एसडीपीओंवर सोपवून जिल्हा पोलीस प्रशासनाने धाड फेल होणार नाही याची खास खबरदारी घेतल्याचे दिसते. हा आंतरराज्यीय जुगार अड्डा पूर्वी पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटणबोरी पोलीस चौकीअंतर्गत येणाºया पिंपळखुटी येथे चालविला जात होता. मात्र त्यांना संपूर्ण संरक्षण हवे होते. हे संरक्षण देण्यासाठी प्रशासनाशी किल्ला लढविण्याची तयारी ‘शिवाजी’ने घेतली आणि हा जुगार अड्डा पाटण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुर्दापूर येथे स्थलांतरित झाला. या शिप्टींगने पांढरकवडा पोलिसांचे मोठे ‘दुकान’ बंद झाल्याने त्यांच्यात हळहळ ऐकायला मिळतच होती. नेमकी तेथे धाड घालण्याची संधी चालून आल्याने जणू पांढरकवडा पोलिसांच्या ‘दुकान’ बुडाल्याच्या दु:खावर फुंकर घातली गेली. पोलीस प्रशासनाने वणी उपविभागावर अविश्वास दाखविण्यामागील नेमके कारण काय?, लिकेजेसची भीती असेल तर संबंधितांवर कारवाई का नाही ?, एवढा मोठा आंतरराज्यीय जुगार अड्डा पोलिसांच्या मूक संमतीशिवाय चालू शकतो का?, एवढे दिवस तो कसा चालला?, आता संबंधित जबाबदार अधिकाºयांवर कारवाई होणार का?, असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. जिल्हा पोलीस प्रशासनाकडून या प्रश्नांच्या उत्तराची जनता अपेक्षा करीत आहे. पाटण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यात वाढ झाली आहे. पाटण परिसरात अवैध दारूचा अक्षरश: महापूर वाहत आहे. ही दारू आंध्रप्रदेशातून आणली जात असल्याचे जाणकार सांगतात. या व्यवसायातूनही दररोज लाखो रूपयांची उलाढाल होत आहे.
यवतमाळात ‘ट्रिगर’वर शिजला ‘खबर’ पोहोचविण्याचा कट
यवतमाळातून कळंब-पांढरकवडा रोडला दोन्ही बाजूंनी जोडणाºया एका आदर्श गावात भला मोठा जुगार अड्डा सुरू आहे. तेथे दररोजची कट्टी सुमारे ४० लाखांच्या घरात असल्याचे सांगितले जाते. तेथील बहुतांश गेम ट्रिेगरवर चालतात. तेथेच अनधिकृतरीत्या हा जुगार अड्डा व बारसुद्धा चालविला जातो. सायंकाळपासून तेथे गर्दी वाढते. सर्व सोईसुविधा उपलब्ध असल्याने विविध भागातील प्रतिष्ठीत तेथे खेळण्यासाठी येतात. या जुगार अड्ड्याला राजकीय संरक्षणही असल्याचे सांगितले जाते. मात्र सुर्दापूरच्या आंतरराज्यीय जुगार अड्ड्याने जणू यवतमाळनजीकच्या या अड्ड्यापुढे स्पर्धक म्हणून आव्हान उभे केले होते. सुर्दापूरचा अड्डा बंद झाल्यास शौकीन यवतमाळच्या संरक्षित अड्ड्यावर खेळायला येतील, असा अंदाज बांधला गेला. त्यातूनच सुर्दापूरच्या जुगार अड्ड्याची खबर पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचा कट रचला गेल्याची माहिती पोलीस वर्तुळातूनच पुढे आली आहे. ठरल्याप्रमाणे पाटण-बोरी परिसरातून फोन कॉल झाला आणि अपेक्षेनुसार सुर्दापूरच्या जुगार अड्ड्यावरील भली मोठी धाड यशस्वी झाली. सुर्दापूरच्या या जुगार अड्ड्याप्रकरणी पोलीस दलातील संबंधित कुणा-कुणावर काय-काय कारवाई पोलीस प्रशासन करते याकडे नजरा लागल्या आहेत. हा अड्डा विधीमंडळातही गाजण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Extension of the SDPs, forage from the white box

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.