नजर पीक पैसेवारी ६३ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 10:00 PM2017-10-02T22:00:34+5:302017-10-02T22:00:57+5:30

जिल्ह्यात अपुºया पावसाने सर्वच पिकांची स्थिती गंभीर असताना जिल्ह्याची नजर पैसेवारी मात्र उत्तम निघाली आहे.

Eye peak money 63 percent | नजर पीक पैसेवारी ६३ टक्के

नजर पीक पैसेवारी ६३ टक्के

Next
ठळक मुद्देमहसूल सर्वेक्षण : शेतकरी हादरले, स्थिती नाजूक तरीही अहवाल उत्तम !

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात अपुºया पावसाने सर्वच पिकांची स्थिती गंभीर असताना जिल्ह्याची नजर पैसेवारी मात्र उत्तम निघाली आहे. महसूल प्रशासनाने सादर केलेल्या अहवालात नजर पैसेवारी ६३ टक्के असून २०४९ महसूली गावाची पैसेवारी उत्तम असल्याचा निर्वाळा दिला आहे. मूग, उडीद हातचे गेले असून ज्वारीवरही चिकटा आला आहे. सोयाबीन धोक्यात असून कापूस उलंगवाडीच्या मार्गावर आहे. मात्र महसूल प्रशासनाने एका जागेवर बसून केलेल्या हवाई सर्वेक्षणाचा जबर हादरा शेतकºयांना बसला आहे.
जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या यंदा ६० टक्केच पावसाची नोंद झाली. पीक फुलोरा अवस्थेत असताना पावसाने पाठ फिरवली. काही भागात तर पाऊस बरसलाच नाही. निसर्गाच्या या लहरीपणाचा सर्वाधिक फटका शेतकºयांना बसला आहे. यानंतरही जिल्ह्याची पैसेवारी ६३ टक्के आहे. २०४९ महसूली गावाची पैसेवारी उत्तम असल्याचा निर्वाळा नजर पैसेवारीत जाहीर झाला आहे.
प्रारंभीपासून जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरू होता तो अखेरपर्यंत कायम राहिला. यामुळे हलक्या जमिनीतील पिकांनी वेळेपूर्वीच अवसान सोडले आहे. मूग आणि उडीद पिकाला याचा सर्वाधिक फटका बसला. १० हजार हेक्टरवर मूग आणि आठ हजार हेक्टरवर शेतकºयांनी उडीदाची पेरणी केली. फुलोरा अवस्थेत या ठिकाणी पाऊस नव्हता. त्यातच किडीचे आक्रमण झाले. यामुळे मूग आणि उडीदाचे पीक जिल्ह्यातील शेतकºयांना झाले नाही. ज्वारीची अवस्था अशीच आहे. सोयाबीनची अवस्था अशीच झाली. यामुळे झाडाला शेंगा लागल्या. आता सोयाबीनचा उताराही निम्माच येत आहे. जिल्ह्यात संपूर्ण पिकांची स्थिती चिंताजनक असताना महसूल प्रशासनाला मात्र शेतात समृद्धी दिसली. जागेवर बसून केलेल्या हवाई सर्वेक्षणात पैसेवारी ६३ टक्के आली. ५० टक्क्याच्यावर पैसेवारी आल्यास स्थिती उत्तम समजून शासनाची कोणतीही मदत मिळत नाही. त्यामुळे हा नजर अहवाल पाहून शेतकरी हादरले आहे.
वेळेपूर्वीच कपाशीचे कोवळे बोंड फुटले
एकीकडे अपुरा पाऊस आणि दुसरीकडे उन्हाचा वाढता पारा याचा फटका पिकांना बसत आहे. कपाशीचे बोंड वेळेपूर्वीच परिपक्व होऊन फुटत आहे. त्यामुळे एक-दोन वेच्यातच शेतात उलंगवाडी होण्याची स्थिती आहे.

Web Title: Eye peak money 63 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.