फेसबुक हॅक होण्याचे प्रमाण वाढले; पासवर्ड सतत बदलता ना? अनोळखी फ्रेन्ड रिक्वेस्ट स्वीकारू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2021 05:00 AM2021-11-11T05:00:00+5:302021-11-11T05:00:29+5:30
बऱ्याचदा आपल्या अकाउंटवरून हॅकर्स चुकीचे मॅसेज, फोटो, व्हिडीओ प्रसारित करू शकतात. त्यामुळे प्रत्येकाने सतर्क असणे गरजेचे आहे. अकाउंट हॅक होणार नाही यासाठी स्वत:लाच खबरदारी घेण्याची गरज आहे. सातत्याने अकाउंटचा पासवर्ड बदलत राहावा. टू स्टेप्स व्हेरिफिकेशन करून घ्यावे. पासवर्ड हा जास्तीत जास्त सुरक्षित करता येईल, यावर भर द्यावा. जेणेकरून अकाउंट हॅक होणार नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सोशल मीडियावर स्वत:चे खाते सुरक्षित ठेवणे आता महत्त्वाचे आहे. फेसबुकवरील अकाउंट हॅक करून फ्रेन्डलिस्टमधील मित्रांची फसवणूक केली जाऊ शकते. बऱ्याचदा आपल्या अकाउंटवरून हॅकर्स चुकीचे मॅसेज, फोटो, व्हिडीओ प्रसारित करू शकतात. त्यामुळे प्रत्येकाने सतर्क असणे गरजेचे आहे. अकाउंट हॅक होणार नाही यासाठी स्वत:लाच खबरदारी घेण्याची गरज आहे. सातत्याने अकाउंटचा पासवर्ड बदलत राहावा. टू स्टेप्स व्हेरिफिकेशन करून घ्यावे. पासवर्ड हा जास्तीत जास्त सुरक्षित करता येईल, यावर भर द्यावा. जेणेकरून अकाउंट हॅक होणार नाही.
टू स्टेप्स व्हेरिफिकेशन केले का?
- फेसबुक हाताळणाऱ्या प्रत्येकाने स्वत:च्या अकाउंटचे टू स्टेप्स व्हेरिफिकेशन करून घेणे आवश्यक आहे.
- प्रोफाइलमध्ये असलेले फोटो लाॅक करून ठेवावे. ओन्ली फ्रेन्डस यावरच टीक करून ठेवावे. जेणेकरून इतरांना दिसणार नाही.
हॅकिंग टाळण्यासाठी हे उपाय करा
- अकाउंटचा पासवर्ड सतत बदलत राहा. पासवर्ड अधिक सुरक्षित करण्यासाठी त्यामध्ये क्रमांक, अल्फाबेट, स्पेशल कॅरेक्टर हवेत.
- पासवर्डमध्ये स्वत:चे नाव, जन्मतारीख, टोपण नाव, मोबाइल क्रमांक, वाहन क्रमांक याचा वापर करू नये.
- स्वत:विषयीची माहिती घेऊन पासवर्ड तयार केल्यास तो सहज हॅक केला जाऊ शकतो. आता ही अतिशय काॅमन ट्रिक झाली आहे. त्यामुळे सहज पासवर्ड हॅक होतो.
पैशाचा व्यवहार टाळा
सोशल मीडियावरील अकाउंट हाताळताना स्वत:ही जबाबदार असणे आवश्यक आहे. सोशल मीडियावरून पैशांचा व्यवहार करूच नये. कुठल्याही जाहिराती, प्रलोभनांना बळी पडू नये, अनोळखी व्यक्तींना प्रतिसाद देऊ नये.
- अमोल पुरी,
सहायक निरीक्षक,
सायबर सेल, यवतमाळ