कर्मचाऱ्यांना तीन दिवस पोस्टल मतदानासाठी सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 06:06 PM2024-11-15T18:06:00+5:302024-11-15T18:09:57+5:30

१९ ला महिला तंत्रनिकेतनमधील चार केंद्रांवर होणार मतदान : यवतमाळ विधानसभा क्षेत्रात ईडीसी चालणार नाही

Facility for postal voting for employees for three days | कर्मचाऱ्यांना तीन दिवस पोस्टल मतदानासाठी सुविधा

Facility for postal voting for employees for three days

लोकमत न्यूज नेटवर्क 
यवतमाळ :
मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेट पद्धतीने मतदान करता येणार आहे. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी मतदारांची संख्या पाहता मतदानासाठी तीन दिवस मतदानाची सुविधा राहणार आहे. उपविभागीय कार्यालयात तशी व्यवस्था असणार आहे. १७ ते १९ नोव्हेंबरदरम्यान या ठिकाणी मतदान करता येणार आहे.


यवतमाळमधील उपविभागीय कार्यालयात आणि धामणगाव मार्गावरील महिला तंत्रनिकेतनध्ये मतदानाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यातील धामणगाव मार्गावरील महिला तंत्रनिकेतनमध्ये चार केंद्रे उभारण्यात आली आहेत. यात निवडणूक प्रक्रियेत समाविष्ट असलेल्या कर्मचाऱ्यांकरिता परजिल्ह्यातील मतदार, यवतमाळ विधानसभा क्षेत्रातील महिला मतदार, पुसद आणि दिग्रस विधानसभा क्षेत्रातील मतदार, त्याचप्रमाणे राळेगाव, वणी आणि आर्णी विधानसभा क्षेत्रातील मतदार असे चार स्वतंत्र बूथ धामणगाव मार्गावरील महिला तंत्रनिकेतनमध्ये उभारले आहेत. या ठिकाणी मंगळवारी आणि बुधवारी मतदान प्रक्रिया झाली. आणि याच ठिकाणी १९ नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया होणार आहे. या प्रत्येक मतदान बूथची क्षमता २०० मतदारांच्या मतदानाची आहे. यासोबत ४७५ पोलिस कर्मचाऱ्यांच्या मतदानासाठी उपविभागीय कार्यालयात मतदान केंद्र उभारलेले आहे. या ठिकाणी १७, १८ तसे १९ नोव्हेंबरला मतदान करता येणार आहे. 


केवळ पोस्टल मतदानाला परवानगी 
यवतमाळ विधानसभा क्षेत्रात पोस्टल मतदानानेच मतदान करता येणार आहे. यवतमाळ विधानसभा क्षेत्रात ईडीसी सर्टिफिकेटच्या माध्यमातून होणारे मतदान करण्यास यावेळी बंदी घालण्यात आली आहे. यामुळे यवतमाळ विधानसभा क्षेत्रात निवडणूक प्रक्रियेसाठी निवडण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना पोस्टल मतदानानेच मतदान करावे लागणार आहे.

Web Title: Facility for postal voting for employees for three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.