बनावट सुगंधी तांदूळ कारखान्याचा पर्दाफाश

By Admin | Published: August 26, 2016 02:21 AM2016-08-26T02:21:44+5:302016-08-26T02:21:44+5:30

बासमती तांदूळाच्या नावाखाली बनावट सुगंधी तांदूळ तयार करणाऱ्या कारखान्याचा शहर ठाण्याच्या पथकाने पर्दाफाश केला.

The fake aromatic rice factory busted | बनावट सुगंधी तांदूळ कारखान्याचा पर्दाफाश

बनावट सुगंधी तांदूळ कारखान्याचा पर्दाफाश

googlenewsNext

एकास अटक : लेबल व सुगंधी पावडर जप्त
यवतमाळ : बासमती तांदूळाच्या नावाखाली बनावट सुगंधी तांदूळ तयार करणाऱ्या कारखान्याचा शहर ठाण्याच्या पथकाने पर्दाफाश केला. येथील महात्मा फुले चौकात धाड टाकून लेबल व सुगंधी पावडर जप्त करण्यात आले. या प्रकरणी पश्चिम बंगालच्या एका तरुणाला अटक करण्यात आली.
जयंतो जीवन गोलदार (२१) रा. अशोकनगर यवतमाळ, मूळ रहिवाशी माणिकतला कोलकाता (पश्चिम बंगाल) असे आरोपीचे नाव आहे. यवतमाळात दारावर येऊन अतिशय स्वत:त बासमती तांदूळ विकण्याचा प्रयत्न सुरू आहे. याला अनेक जण बळी पडत आहे. मात्र हे तांदूळ बनावट असल्याचे पोलिसांनी टाकलेल्या धाडीत सिद्ध झाले. येथील महात्मा फुले चौकातील नगरपरिषद शाळेमागे होत असल्याची माहिती शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोयर यांना मिळाली. त्यांनी सापळा रचून या कारखान्यावर धाड टाकली. त्यांना विविध कंपनीच्या बॅगांमध्ये भरलेले तांदळाचे २० कट्टे सापडले. कट्टे सील करण्यासाठी वापरण्यात येणारी शिलाई मशीन, तांदळाला विविध प्रकारचा सुगंध येण्यासाठी वापरले जाणारे सोनारेक्स बासमती फ्लेवर पावडर, इंडियन सोना मैसूर राईस असे लिहून असलेल्या खाली पिशव्या, बॅगांचे बंडल, स्प्रिंग तराजू असे विविध साहित्य या ठिकाणी मिळाले. आरोपी लोकल तांदळाला फ्लेवर पावडरचा उपयोग करून ब्रॅन्डेड बनविण्याचे काम करीत होते. या प्रकरणी केवळ बंगाल येथून आलेला एक आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे. इतर आरोपींचा शोध घेत आहेत. तूर्त या प्रकरणी भादंविच्या कलम ४६८ नुसार गुन्हा नोंदविला. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: The fake aromatic rice factory busted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.