घरकूल लाभार्थ्यांची रेतीसाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 11:39 PM2019-03-02T23:39:43+5:302019-03-02T23:40:03+5:30

शहर व तालुक्यात घरकुल बांधकामांसाठी रेती मिळत नसताना कंत्राटदारांकडून कामे कशी काय सुरू आहेत, या बांधकामांना रेती कुठून येत आहे, याबाबत याबाबत चौकशी करावी अशी मागणी आहे.

The families of the beneficiaries struggle for the sand | घरकूल लाभार्थ्यांची रेतीसाठी धडपड

घरकूल लाभार्थ्यांची रेतीसाठी धडपड

Next
ठळक मुद्देमाफियांची दबंगगिरी : वाळू तस्करांना महसूल प्रशासनाचे अभय, दामदुपटीने रेतीची विक्री

लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : शहर व तालुक्यात घरकुल बांधकामांसाठी रेती मिळत नसताना कंत्राटदारांकडून कामे कशी काय सुरू आहेत, या बांधकामांना रेती कुठून येत आहे, याबाबत याबाबत चौकशी करावी अशी मागणी आहे. रेती मिळविण्यासाठी धडपड करणाऱ्या घरकुल व शौचालय लाभार्थ्यांची दमछाक होत असल्याचे चित्र आहे.
तालुक्यात सन-२०१७-१८ या वषार्तील मंजूर झालेली विविध योजनेतील घरकुल, वैयक्तीक शौचालये, यासह नवीन वर्षात मंजूर झालेल्या पंतप्रधान आवास योजना घरकुल, शबरी भिल, रमाई आवास आदी योजनांचे लाभार्थी आहेत. अनेकांना घरकूल मंजूर झाले आहेत. मात्र रेती मिळत नसल्याने गरीबांच्या घराच्या कामाला अजुनपर्यंत सुरूवात झाली नाही. मात्र कंत्राटदारांकडून कामे बिनधास्तपणे सुरू आहेत. तसेच साठवलेल्या वाळूवर प्रशासनाची करडी नजर आहे, तर दुसरीकडून रेती मिळण्यास अनेक अडचणी येत आहेत. यामुळे योजनेतील मंजूर बांधकामाला ेरेतीअभावी खीळ बसली आहे. पंचायत समितीच्यावतीने घरकुले मंजूर आहेत. याच्या बांधकामाअभावी लाभार्थ्यांचा पहिला हप्ता खात्यावर वर्ग झाला नाही. त्यामुळे या योजना केवळ कागदावर मंजूर झाल्या आहेत. रेतीची तस्करी होत असताना तहसील प्रशासन झोपेत आहे की काय? असा प्रश्न जनतेपुढे निर्माण झाला आहे. तालुक्यात रेती तस्करी करणारे रेती माफिया आपले वर्चस्व गाजवून पैनगंगा व खुनी नदीपात्रातील रेतीची तस्करी करित आहेत. एकंदरीत रेतीतस्करी जोमात व तहसील प्रशासन कोमात असे म्हणण्याची वेळ आली आहे. तलाठ्यांची ‘अर्थ’पूर्ण डोळेझाक होत असुन तालुक्यात रेती तस्करांची दबंगगिरी सुरु आहे. पहाटेच्या सुमारास व रात्री नदीतून रेती ट्राक्टरने वाहुन नेली जात आहे. संबंधित रेती माफियांचे व तलाठ्यांचे साटेलोटे असल्याने हा सर्व प्रकार सुरु असल्याचे बोलले जात आहे.

चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक
रेती घाटांची लिलाव प्रक्रिया रखडली असल्याने घरकुल बांधकामांसाठी रेती उपलब्ध नाही. मात्र खासगी बांधकामांसाठी रेती उपलब्ध आहे. त्यामुळे चोरट्या मार्गाने रेती घाटांतील वाळूची अवैध वाहतूक वाढली आहे. खासगी बांधकामांसाठी रेतीचा वापर करण्यात येत असल्याचेही चित्र आहे.

Web Title: The families of the beneficiaries struggle for the sand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sandवाळू