‘जेडीआयईटी’मध्ये निरोप समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 10:15 PM2018-04-24T22:15:10+5:302018-04-24T22:15:10+5:30
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांकरिता निरोप समारंभ पार पडला. एकूण आठ विभागातील विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे सचिव किशोर दर्डा अध्यक्षस्थानी होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांकरिता निरोप समारंभ पार पडला. एकूण आठ विभागातील विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे सचिव किशोर दर्डा अध्यक्षस्थानी होते.
प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर, विभाग प्रमुख डॉ. आर.एस. तत्त्ववादी, प्रा. जी.एस. काकड, डॉ. पी.एम. पंडित, प्रा. जे.एच. सातुरवार, डॉ. ए.डी. राऊत, समन्वयक प्रा. ए.डी. पारडे, स्टुडंट कोआॅर्डिनेटर डॉ. यू.व्ही. कोंगरे व्यासपीठावर उपस्थित होते.
अभियंता सकारात्मक मार्गाने स्वत:ची व समाजाची दिशा बदलवू शकतो. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी चांगला समाज घडविण्यासाठी वाटचाल करावी, जिद्द व चिकाटीने समाजाला पुढे घेऊन जावे. रोजगार निर्मिती करावी, असे आवाहन किशोर दर्डा यांनी अध्यक्षीय भाषणातून केले.
विद्यार्थी प्रमुख नितेश धैर्य यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा उत्कृष्ट महाविद्यालयात उपयोगात आणल्याचे त्याने सांगितले. व्यक्तिमत्व विकास, सहअभ्यासी व इतर अभ्यासी तसेच क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी अनुकूल वातावरण महाविद्यालयामध्ये आहे. त्याचा पुरेपूर उपयोग सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे तो म्हणाला.
प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर म्हणाले, महाविद्यालयातील अभ्यासू वातावरणामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीला वाव मिळतो. यामुळे दरवर्षी अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत येतात. यावर्षी सर्व विभागातील सुमारे २३२ विद्यार्थ्यांची निवड विविध नामांकित कंपनीत झाली आहे, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे संचालन वैष्णवी परडखे व सौरभ जिरापुरे यांनी केले. आभार समन्वयक प्रा. ए.पी. पारडे यांनी मानले.