‘जेडीआयईटी’मध्ये ‘फेअरवेल’ उत्साहात
By admin | Published: April 16, 2016 02:00 AM2016-04-16T02:00:10+5:302016-04-16T02:00:10+5:30
स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना निरोप (फेअरवेल) समारंभ घेण्यात आला.
यवतमाळ : स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना निरोप (फेअरवेल) समारंभ घेण्यात आला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी भविष्यातील वेगवेगळ्या संधींविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर, मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा.डॉ. ए.बी. बोराडे, आयटी विभाग प्रमुख प्रा.डॉ. ए.डी. राऊत, केमिकल विभाग प्रमुख प्रा. एस.एच. आमले, टेक्सटाईल विभाग प्रमुख प्रा. जी.एच. काकड, सीएसई विभाग प्रमुख प्रा. जे.एच. सातुरवार, प्रा. पी.एम. पंडित, स्टुडंट अफेअर को-आॅर्डिनेटर प्रा.डॉ. यू.व्ही. कोंगरे, फेअरवेल को-आॅर्डिनेटर प्रा. एम.आर. शहाडे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर यांनी समयोचित मार्गदर्शन केले. प्रा.डॉ. कोंगरे यांनी भविष्यातील आव्हानांना सामोरे कसे जायचे, याविषयी माहिती दिली. याप्रसंगी विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (वार्ताहर)