यवतमाळ जिल्ह्यातील फरकाडे कुटुंबाने लाडक्या श्वानाच्या निधनानंतर केली तेरावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 10:22 AM2020-11-11T10:22:01+5:302020-11-11T10:22:57+5:30

Yawatmal News Dog राळेगाव तालुक्यातील लक्ष्मण फरकाडे परिवाराने आवडत्या कुत्रीच्या मृत्यूनंतर तेरावी घातली आणि अतूट प्रेमाचे उदाहरण घालून दिले .

The Farkade family in Yavatmal district did ritual after the death of a pet dog | यवतमाळ जिल्ह्यातील फरकाडे कुटुंबाने लाडक्या श्वानाच्या निधनानंतर केली तेरावी

यवतमाळ जिल्ह्यातील फरकाडे कुटुंबाने लाडक्या श्वानाच्या निधनानंतर केली तेरावी

Next
ठळक मुद्दे१०० जणांना जेवू घातले

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: बदलत्या जगात माणसे एकाकी पडत चालली आहेत आणि नातेवाईक किंवा मित्र-मैत्रिणींचा संख्याही कमी होते आहे. अशावेळी मन हलके करण्यासाठी कुणाला सोशल मीडियाचा आधार जवळचा वाटतो तर कुणाचे मैत्र अबोल प्राण्यांशी जुळते. त्यातही कुत्रा आणि माणूस यांच्यातील नाते तर कायमच अवर्णनीय राहिले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यतील भाम येथे एका कुटुंबाने आपल्या आवडत्या कुत्रीच्या मृत्यूनंतर चक्क तेरवीचा नेम धरत तब्बल १०० लोकांना जेवू घातले अन् अशाच अतूट प्रेमाचे उदाहरण घालून दिले. राळेगाव तालुक्यातील भाम येथे लक्ष्मण फरकाडे यांचे शेत आहे . या शेतातील मंदिरात त्यांची कुत्री राहात होती. सगळे तिला परी म्हणायचे. अचानक काही दिवसांपूर्वी तिचा अचानक मृत्यू झाला. शोकाकुल फरकाडे परिवाराने विधिवत तिची तेरावी घातली आणि अशाच अतूट प्रेमाचे उदाहरण घालून दिले . काही वर्षांपूर्वी त्यांच्या आवडत्या गायीचा मृत्यू झाला होता. त्यांनी तिची अशीच विधीवत तेरावी करून तिचे शेतात स्मारक बनविले आहे .

Web Title: The Farkade family in Yavatmal district did ritual after the death of a pet dog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.