शेती समृद्ध रोहडाची शिक्षण समृद्धीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 10:08 PM2018-03-01T22:08:36+5:302018-03-01T22:08:36+5:30

निसर्गाची कृपा आणि शेतकऱ्यांच्या मेहनतीने समृद्ध झालेले गाव म्हणजे तालुक्यातील रोहडा. मात्र शिक्षणाच्या दृष्टीने अतिशय मागासलेले परंतु शासनाच्या ‘महाराष्ट्र व्हीलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन’.....

Farm-rich Rohida's education will move towards prosperity | शेती समृद्ध रोहडाची शिक्षण समृद्धीकडे वाटचाल

शेती समृद्ध रोहडाची शिक्षण समृद्धीकडे वाटचाल

Next
ठळक मुद्देग्राम परिवर्तनाची कथा : युवक मंडळाच्या सहकार्यातून अभ्यासिकेचे लोकार्पण

ऑनलाईन लोकमत
पुसद : निसर्गाची कृपा आणि शेतकऱ्यांच्या मेहनतीने समृद्ध झालेले गाव म्हणजे तालुक्यातील रोहडा. मात्र शिक्षणाच्या दृष्टीने अतिशय मागासलेले परंतु शासनाच्या ‘महाराष्ट्र व्हीलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन’चा परिस्पर्श गावाला झाला आणि अख्ख गाव शिक्षणाच्या बाबतीतही समृद्ध होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागले. गावाच्या वडीलधाºया मंडळींची बदलली मानसिकता आणि युवकांच्या सहकार्यातून गावात अभ्यासिकेने बाळसे धरले. २८ फेब्रुवारी रोजी या अभ्यासिकेचे लोकार्पण झाले.
महाराष्ट्र ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानामुळे ही किमया घडली. रोहडा हे पुसद तालुक्यातील शेतीसमृद्ध गाव परंतु आता या गावाची ओळख शिक्षण समृद्ध अशी होऊ लागली आहे. गावात मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तकाची नेमणूक झाली. त्यांनी सूक्ष्मनियोजनातून गावातील महत्वाचे प्रश्न समोर आणले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गोडी लागावी यासाठी अभ्यासिका निर्माण करण्याचे ठरविले. सरपंच संजय डोईफोडे आणि पदाधिकाºयांनी सकारात्मक प्रतिसाद देत एक खोली उपलब्ध करून दिली. अवघ्या काही दिवसात येथे अभ्यासिका सजविण्यात आली. अभ्यासिकेसाठी अधिकाधिक पुस्तके मिळविण्याचा प्रयत्न सुरू झाला. प्रतिष्ठीत नागरिक, नोकरीवर असलेले नागरिक यांना साकडे घालण्यात आले. शिक्षक दीपक डोईफोडे यांचे यासाठी विशेष सहकार्य लाभले. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दीपक हरिमकर यांनी अभ्यासिकेला ५० पुस्तके दिली. या सुसज्ज अभ्यासिकेचे लोकार्पण गटविकास अधिकारी समाधान वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच संजय डोईफोडे, उपसरपंच मारोती टोम्पे,पोलीस पाटील राजू पारीसकर, तंटामुक्त अध्यक्ष दीपक हरीमकर, ग्रामविकास अधिकारी विजय मस्के उपस्थित होते.
मुख्यमंत्री ग्रामप्रवर्तक बाळू राठोड यांच्या अथक प्रयत्नातून ही किमया घडवून आणली. ही अभ्यासिका गावासाठी परिवर्तनाची नांदी ठरणार आहे. येत्या काळात या अभ्यासिकेला डिजीटल तंत्रज्ञानाची जोड देण्याचा मानस बाळू राठोड यांनी व्यक्त केला.

Web Title: Farm-rich Rohida's education will move towards prosperity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.