यवतमाळ जिल्ह्यातील उटी येथे शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 05:19 PM2020-10-29T17:19:21+5:302020-10-29T17:20:15+5:30
Yawatmal News farmer suicide महागाव तालुक्यातील उटी येथील शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महागाव तालुक्यातील उटी येथील शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.
संतोष आनंदराव गावंडे (४५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. तालुक्यात एकाच आठवड्यातील ही दुसरी शेतकरी आत्महत्या आहे. यापूर्वी जिवंत वीज तार पायाला गुंडाळून पंजाबराव गावंडे या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना उटी येथेच घडली होती. त्यानंतर संतोष गावंडे यांनीही मृत्यूला कवटाळले. त्यांच्याकडे साडेतीन एकर शेती आहे. अतिपावसाने पीक नष्ट झाल्याने ते विवंचनेत होते. त्यांच्याकडे सवना सोसायटीचे दोन लाखांचे कर्ज होते. याशिवाय खासगी कर्जसुद्धा होते. त्यामुळे गुरुवारी सकाळी शेतात जावून संतोषने जांभळाच्या झाडाला गळफास लावला. त्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली. त्यात आपल्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरू नये, असा उल्लेख आहे. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुली, मुलगा आणि मोठा आप्त परिवार आहे.