पिकाच्या नुकसानीमुळे यवतमाळमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 06:00 PM2019-10-30T18:00:13+5:302019-10-30T18:00:35+5:30
परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकºयाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील माळकिन्ही येथे बुधवारी घडकीस आली.
यवतमाळ - परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकºयाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील माळकिन्ही येथे बुधवारी घडकीस आली.
गजानन रामजी शिरडकर (४७), असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. गेल्या दोन दिवसांपासून परतीचा पाऊस सुरू आहे. या पावसाने गजानन यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यांच्याकडे चार एकर शेती होती. याच शेतीवर बँकेचे कर्जही आहे. त्यात परतीच्या पावसाने मोठे नुकसान झल्याने गजानन खचून गेला होता. मुलगीही लग्नाला आली. या विवंचनेत गजानन शिरडकर यांनी बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. या आठवड्यात परतीच्या पावसाने पिकांची झालेली नासाडी बघून ते खचले होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा आप्त परिवार आहे.