दिग्रसमध्ये शेतकरी महावितरणवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 11:55 PM2017-11-03T23:55:07+5:302017-11-03T23:55:18+5:30

थकीत बिलापोटी वीज वितरण कंपनीने कृषिपंपांचा पुरवठा खंडित करण्याचा सपाटा लावला आहे. ऐन हंगामात होत असलेल्या कारवाईने शेतकरी हतबल झाले असून.....

Farmer Mahavitaran on Digras | दिग्रसमध्ये शेतकरी महावितरणवर

दिग्रसमध्ये शेतकरी महावितरणवर

Next
ठळक मुद्देकृषिपंपधारक त्रस्त : वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : थकीत बिलापोटी वीज वितरण कंपनीने कृषिपंपांचा पुरवठा खंडित करण्याचा सपाटा लावला आहे. ऐन हंगामात होत असलेल्या कारवाईने शेतकरी हतबल झाले असून शुक्रवारी तालुक्यातील शेकडो शेतकरी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडकले.
नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीने तालुक्यातील शेतकºयांना कृषिपंपांचे बिल भरणे शक्य झाले नाही. या बिलापोटी वीज वितरणने पुरवठा खंडित करण्याचा सपाट लावला. परंतु थकबाकीदारांना शासनाने १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. असे असतानाही वीज वितरणचे अधिकारी पुरवठा खंडित करीत आहे. त्यामुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. याबाबत जाब विचारण्यास तालुक्यातील शेतकरी शुक्रवारी वीज वितरण कार्यालयावर धडकले. त्यांनी उपकार्यकारी अभियंता गणेश चव्हाण यांना निवेदन देवून प्रश्नांचा भडीमार केला.

Web Title: Farmer Mahavitaran on Digras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.