वाघाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 09:33 PM2017-09-21T21:33:21+5:302017-09-21T21:33:40+5:30

शेतानजीक जंगलात गाई चारण्यासाठी गेलेल्या शेतकºयावर वाघाने हल्ला केल्याची घटना कळंंब तालुक्यातील खडकी-पोटगव्हाण जंगलात गुरूवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली.

Farmer seriously injured in Wagah attack | वाघाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

Next
ठळक मुद्देखडकी-पोटगव्हाण जंगलातील घटना : गाई धावून आल्याने वाचले शेतकºयाचे प्राण

यवतमाळ/डोंगरखर्डा : शेतानजीक जंगलात गाई चारण्यासाठी गेलेल्या शेतकºयावर वाघाने हल्ला केल्याची घटना कळंंब तालुक्यातील खडकी-पोटगव्हाण जंगलात गुरूवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला असून त्याला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. वाघाने हल्ला करताच गाई धावून आल्याने शेतकºयाचे प्राण वाचले.
बाबाराव कवडू आडे (५५) रा. खडकी, असे जखमी शेतकºयाचे नाव आहे. खडकी-पोटगव्हाण शिवारात त्यांचे शेत आहे. आपल्या घरच्या गाई घेऊन गुरुवारी सकाळी ते शेतानजीकच्या जंगलात गेले होते. गाई चारत असताना अचानक पाठीमागून वाघाने हल्ला केला. त्याच वेळी कळपातील गाई वाघावर तुटून पडल्या. त्यामुळे वाघ पळून गेला. मात्र या हल्ल्यात शेतकरी बाबाराव गंभीर जखमी झाला. त्यांच्या डोक्यावर, पाठीवर आणि मांडीवर वाघाच्या पंजा व दातांमुळे गंभीर जखमा झाल्या.
या जंगलात मदतीसाठी कुणीही नसल्याने जखमी अवस्थेतच दोन किलोमीटर अंतरावरील गाव बाबारावने गाठले. त्यांना तत्काळ नांझा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. यावेळी रूग्णालयासमोर गावकºयांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, अधिक उपचारासाठी त्यांना यवतमाळच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. येथे वैद्यकीय अधिकाºयांनी बाबाराव यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच जोडमोहा वनपरिक्षेत्रातील वनपाल व वनरक्षक यांनी खडकी येथे भेट दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन वानखडे जखमी शेतकºयासोबत शासकीय रूग्णालयात आले. सहायक वनसंरक्षक गहुपाल राठोड यांनी रूग्णालयात भेट देऊन रूग्णाच्या नातेवाईकांना दिलासा दिला. वन विभागाचे स्थानिक अधिकारी-कर्मचारी यांनी घटनास्थळ गाठून नेमका काय प्रकार आहे, याची खातरजमा करणे सुरू केले आहे. वृत्तलिहिस्तोवर त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. राळेगाव तालुक्यातील सखी-कृष्णापूर येथे वाघाच्या हल्ल्यावरून ग्रामस्थांनी हिंसक आंदोलन केले होते. ही पार्श्वभूमी लक्षात घेता वाघाच्या हल्ल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे.
नरभक्षक वाघाचा शोध सुरूच
राळेगाव व कळंंब तालुक्यांमध्ये वन विकास महामंडळाचे घनदाट जंगल आहे. तेथे नरभक्षक वाघ सातत्याने मनुष्य हानी करीत आहे. या वाघाला पकडण्यासाठी मागील सहा दिवसांपासून पाच पथके जंगल पिंजून काढत आहे. मात्र त्यांना अद्याप यश आले नाही. उलट वाघाच्या हल्ल्याच्या घटना वाढत असून परिसरातील दहशत कायम आहे.

Web Title: Farmer seriously injured in Wagah attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.