यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी पुत्राची भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 11:24 AM2019-05-09T11:24:02+5:302019-05-09T11:24:31+5:30
जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्यातील अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्याने जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर शैक्षणिक क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्यातील अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्याने जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर शैक्षणिक क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. अभिजित रवींद्र वीर (रा.मालखेड खु.) असे या गुणवंताचे नाव आहे.
वर्ग सहावीसाठी त्याची नवोदय विद्यालय बेलोरा (ता.घाटंजी) येथे निवड झाली. याच विद्यालयातून त्याने दहावीत ९५ टक्के गुण घेतले. सोबतच घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत यशस्वी झाल्याने त्याची निवड वर्ग अकरावी, बारावी आणि जेईईसाठी नवोदय विद्यालय कोट्यायम (केरळ) येथे झाली. या संधीच्या जोरावर त्याने जेईई मेनमध्ये ९७.५ टक्के, तर बारावी सीबीएसई परीक्षेत ९३.५ टक्के गुण घेत यश मिळविले आहे. त्याची आयआयटी मुंबईला जाण्याची इच्छा आहे. यासाठी अथक परिश्रमाची तयारी अभिजितने दर्शविली आहे. त्याच्या यशाचे कौतुक होत आहे.