यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 07:44 PM2018-05-22T19:44:47+5:302018-05-22T19:44:55+5:30
पेरणीसाठी पैशाची तरतूद होत नसल्याने हतबल शेतकऱ्याने अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतल्याची घटना दारव्हा तालुक्यातील पिंपळखुटा येथे मंगळवारी दुपारी २.३० वाजता घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पेरणीसाठी पैशाची तरतूद होत नसल्याने हतबल शेतकऱ्याने अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतल्याची घटना दारव्हा तालुक्यातील पिंपळखुटा येथे मंगळवारी दुपारी २.३० वाजता घडली.
धनराज उल्हास चव्हाण (३८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्याकडे पाच एकर शेती असून स्टेट बँकेचे एक लाख १० हजार रुपये कर्ज होते. खरीप हंगाम जवळ आल्याने तो धाणगाव देव येथील स्टेट बँक शाखेत कर्जासाठी गेला होता. परंतु व्यवस्थापकाने त्याला जुनेच कर्ज आहे, आधी ते फेडावे लागेल. त्यानंतर कर्ज मिळेल, असे सांगितले. हतबल झालेल्या धनराजने रणरणत्या उन्हात अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. जखमी अवस्थेत दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी आहे.