शासनाच्या निष्क्रियतेने शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 10:24 PM2018-04-30T22:24:26+5:302018-04-30T22:24:45+5:30

उमरखेड येथील शेतकरी माधवराव रावते यांची आत्महत्या दडपण्यासाठी शासनाने क्रौर्याची परिसीमा गाठली. घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथील शेतकरी शंकर चायरे आणि टिटवी येथील प्रकाश मानगावकर यांची आत्महत्याही बेदखल ठरविली. शासनाच्या निष्क्रयेतेमुळे शेतकरी आत्महत्या होत असून सरकार आणि प्रशासनाविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

Farmer suicides due to inefficiency of the government | शासनाच्या निष्क्रियतेने शेतकरी आत्महत्या

शासनाच्या निष्क्रियतेने शेतकरी आत्महत्या

Next
ठळक मुद्देविखे पाटील : सावळेश्वर, राजूरवाडीला भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड/घाटंजी : उमरखेड येथील शेतकरी माधवराव रावते यांची आत्महत्या दडपण्यासाठी शासनाने क्रौर्याची परिसीमा गाठली. घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथील शेतकरी शंकर चायरे आणि टिटवी येथील प्रकाश मानगावकर यांची आत्महत्याही बेदखल ठरविली. शासनाच्या निष्क्रयेतेमुळे शेतकरी आत्महत्या होत असून सरकार आणि प्रशासनाविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
उमरखेड तालुक्यातील सावळेश्वर व घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचे सांत्वन करण्यासाठी त्यांनी रविवारी या दोन्ही गावांना भेट दिली. सावळेश्वर हे गाव मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतल्यामुळे सरकार रावतेंची आत्महत्या दडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. कर्जमाफी आणि बोंडअळीची मदत न मिळाल्याने रावते यांनी आत्महत्या केली. मात्र सरकार पुरावे दडविण्याचा प्रयत्न करीत असून हा अपघात असल्याचा खटाटोप करीत आहे. विखे यांनी रावते कुटुंबाला एक लाख मदतीचा धनादेश दिला. यावेळी माजी आमदार विजय खडसे, जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते राम देवसरकर, तातू देशमुख, भागवत देवसरकर, दत्तराव शिंदे उपस्थित होते.
समाजातील सर्व घटक सरकारला कंटाळले
घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त चायरे कुटुंबाची राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेतली. तेथे शेतकरी आत्महत्या, शेतमालाचे पडलेले भाव, वाढती गुन्हेगारी यासह प्रत्येकच क्षेत्रात विद्यमान सरकार सपशेल अपयशी ठरले असून समाजातील सर्वच घटक या सरकारला कंटाळल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, महाराष्ट्रात शेतकऱ्यांची दयनीय अवस्था असून गेल्या चार वर्षात शेतमालाचे भाव अर्ध्यावर आले. कर्जमाफीचा लाभ तुरळक शेतकºयांना मिळाला. गुलाबी बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकºयांना अद्याप शासनाने जाहीर केलेली भरपाई मिळाली नाही. शेतकरी थेट सरकार व पंतप्रधानांचे नाव चिठ्ठीत लिहून आत्महत्या करीत आहेत. यावरूनच या सरकार विरोधात किती असंतोष आहे, ते स्पष्ट होते, असे त्यांनी सांगितले. त्यांनी राजूरवाडी येथे मृत शेतकरी शंकर चायरे व प्रकाश मानगावकर यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. दोन्ही कुटुंबांना काँग्रेसतर्फे प्रत्येकी एक लाख रुपये मदत देण्याची ग्वाही दिली. शिवाय कुटुंबातील मुलांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी त्यांनी स्विकारली. यावेळी माजी आमदार विजय खडसे, शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार, सैय्यद रफिक बाबू, संजय निकडे, शालिक चवरडोल, संजय डंभारे, गजानन पाथोडे, गोपाल उमरे, रोहितसिंग सिद्धू आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते
 

Web Title: Farmer suicides due to inefficiency of the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.