हिवरी येथे शेतकरी प्रशिक्षण वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:39 AM2021-03-07T04:39:05+5:302021-03-07T04:39:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क हिवरी : येथे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान मृद आरोग्य पत्रिकांतर्गत शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन कृषी विभागाने केले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरी : येथे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान मृद आरोग्य पत्रिकांतर्गत शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन कृषी विभागाने केले होते. या प्रशिक्षणामध्ये माती नमुना कसा काढायचा, याविषयी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
यावेळी माती परीक्षणानुसारच जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी संतुलित खताचा वापर करणे, सेंद्रिय, जैविक खते, सूक्ष्म मूलद्रव्य आदी विषयांवर माहिती देण्यात आली. उन्हाळी हंगामात घ्यावयाची पिके तसेच पुढील खरीप हंगामाचे पूर्वनियोजन, याविषयी कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक डॉ. सुरेश नेमाडे यांनी मार्गदर्शन केले.
कृषी विभागाच्या योजना, फरदडमुक्त शिवार, विकेल ते पिकेल, प्रक्रिया उद्योग, गटशेती या विषयांवर मंडल कृषी अधिकारी राजेंद्र फाडके यांनी मार्गदर्शन केले. कृषी पर्यवेक्षक ए. बी. दिवे यांनी पीक नियोजन व माती नमुना काढणे याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी मंडल कृषी अधिकारी पी. पी. राठोड यांचा शेतकऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रयोगशील शेतकरी अल्लासिर कोठडिया, किशोर सरोदे यांनी कशाप्रकारे उत्पादकता वाढवली, याविषयी अन्य शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. यावेळी एम. डी. बाळसराफ, पोलीस पाटील दिगंबर शहारे, माजी सरपंच विठोबा कोडापे, अजय शहरे, दत्तात्रय गावंडे, नितीन गावंडे, रामकृष्ण भोंडे, बबन चेके, महेश निवल, रवींद्र ताटू, गंगाधर कोहरे, मकसूद अली, किरण सासकर, राजेश गिरणारे, संजय गावंडे, अमोल चौधरी, अनिल गावंडे, लक्ष्मण शहारे, संजय राऊत, भाऊ सुंदरकर आदी उपस्थित होते.