दिग्रसमध्ये शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 05:00 AM2020-02-25T05:00:00+5:302020-02-25T05:00:19+5:30

शनिवारपासून तालुक्यातील शेतकऱ्यांनी बैलबंडी व विविध वाहनांद्वारे येथील बाजार समितीत आपला कापूस विक्रीस आणला आहे. मात्र शनिवारपासून एकाही वाहनातील कापसाचे मोजमाप झाले नाही. सोमवारी सकाळपासून कापूस खरेदीला सुरुवात होईल, अशी शेतकऱ्यांना अपे होती. मात्र सकाळपासून खरेदीसाठी बाजार समितीने पुढाकार घेतला नाही. सायंकाळी ५ वाजतापर्यंत या वाहनांकडे कुणीही फिरकले नाही. त्यामुळे शेतकºयांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला.

Farmers' agitation in Digras | दिग्रसमध्ये शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन

दिग्रसमध्ये शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन

Next
ठळक मुद्देशिवाजी चौकात ठिय्या : कापूस खरेदीसाठी प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : तीन दिवसांपासून कापूस खरेदीच्या प्रतीक्षेत असलेल्या संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी येथील शिवाजी चौकात चक्काजाम आंदोलन सुरू केले. शेतकऱ्यांनी कापूस भरून आणलेली वाहने रस्त्यात आडवी लावल्याने वाहतूक विस्कळीत झाली.
शनिवारपासून तालुक्यातील शेतकऱ्यांनी बैलबंडी व विविध वाहनांद्वारे येथील बाजार समितीत आपला कापूस विक्रीस आणला आहे. मात्र शनिवारपासून एकाही वाहनातील कापसाचे मोजमाप झाले नाही. सोमवारी सकाळपासून कापूस खरेदीला सुरुवात होईल, अशी शेतकऱ्यांना अपे होती. मात्र सकाळपासून खरेदीसाठी बाजार समितीने पुढाकार घेतला नाही. सायंकाळी ५ वाजतापर्यंत या वाहनांकडे कुणीही फिरकले नाही. त्यामुळे शेतकºयांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला.
सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अनेक शेतकऱ्यांनी आपली कापूस भरलेली विविध वाहने शिवाजी चौकात आणली. पुसद-आर्णी मार्गावरील या चौकात ही वाहने आडवी लावण्यात आली. यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. तब्बल दोन तास पुसद-यवतमाळ मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र घटनास्थळी बाजार समितीचे कोणतेही अधिकारी व संचालक पोहोचले नाही. अखेर तहसीलदार राजेश वझिरे यांनी घटनास्थळी भेट दिली.
तहसीलदारांनी संतप्त शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकºयांनी कापूस खरेदी होत नसल्याने दररोज वाहन भाड्यापोटी एक ते दीड हजार रुपये मोजावे लागत असल्याबद्दल संताप व्यक्त केला. वझिरे यांनी मंगळवारपासून कापूस खरेदी करण्याची ग्वाही दिली. मात्र संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. भाजपचे महादेवराव सुपारे, माजी नगराध्यक्ष रवींद्र अरगडे, मनोज जाधव, विष्णू राठोड, बापुराव पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी तहसीलदारांचा प्रस्ताव फेटाळून लावला. बाजार समितीने कापूस खरेदी बंद असल्याबाबत साधी नोटीसही दिली नसल्याने शेतकºयांनी संताप व्यक्त केला.

तहसीलदारांची मध्यस्थी यशस्वी
सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास तहसीलदार वझिरे यांनी आंदोलक शेतकºयांची पुन्हा चर्चा केली. या चर्चेत सर्व ट्रॅक्टर आर्णी येथील बाजार समितीत पाठविण्याचा निर्णय झाला. आर्णी येथे सोमवारीच या ट्रॅक्टरमधील कापूस मोजणी करण्याची ग्वाही देण्यात आले. तसेच बैलबंडीतील कापूस मंगळवारी सकाळी खरेदी करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आले. त्यामुळे सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. आंदोलनस्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी उदयसिंह चंदेल यांनी भेट दिली.

Web Title: Farmers' agitation in Digras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.