वाकद इजारा येथे शेतकरी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:38 AM2021-03-07T04:38:56+5:302021-03-07T04:38:56+5:30
महागाव : केंद्र शासनाने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. त्याला पाठिंबा दर्शविण्यासाठी तालुक्यात ...
महागाव : केंद्र शासनाने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. त्याला पाठिंबा दर्शविण्यासाठी तालुक्यात वाकद ईजारा येथे घरांवर आणि वाहनांवर काळे झेंडे लावून केंद्र शासनाचा निषेध नोंदविण्यात आला.
शेतकरी आंदोलनाला तब्बल १०० दिवस उलटूनही केंद्र शासनाने दुर्लक्ष केले. आंदोलनात आतापर्यंत २१० शेतकऱ्यांनी प्राणाची आहुती दिली. हे आंदोलन दडपण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव यांनी केला आहे.
आंदोलनाला १०० दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात वाकद ईजारा येथे घरांवर आणि वाहनांवर काळे झेंडे लावून केंद्र शासनाचा घोषणा देऊन निषेध नोंदविण्यात आला. कृषिप्रधान देशातील शेतकऱ्यांची अवहेलना थांबवावी, केंद्र शासनाने शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत, शेतमालाला हमीभाव देऊन संरक्षण द्यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यावेळी केली.